आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजेचा शॉक:विजेचा शॉक लागून मरण; बोरगाव मंजुच्या पितृछत्र हरवलेल्या कृष्णाने मिळवले 92 टक्के

आकोला11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील माऊंट कारमेलचा विद्यार्थी कृष्णा गजानन खांदेल दहावीच्या परीक्षेमध्ये ९२ टक्क्यांसह उत्तीर्ण झाला आहे. गरीब कुटुंबातील कृष्णा खांदेल वर्ग ६ वीत शिकत असताना त्याचे वडील विजेचा शॉक लागून मरण पावले होते. कृष्णाला त्याच्या परिस्थितीची जाणीव होती.

त्यामुळे त्याने सुरुवातीपासून अभ्यासात जिद्द ठेवून येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेमध्ये रात्री १ वाजेपर्यंत निरंतर अभ्यास करून दहावीच्या परीक्षेमध्ये ९२ टक्के गुण मिळवले. कृष्णाची आई जया यांचे यामागे मोठे परिश्रम आहे. कृष्णाच्या या चिकाटीपूर्ण यशाचे गावात सर्वत्र कौतुक होत आहे

बातम्या आणखी आहेत...