आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू की हत्या:दुचाकीवरून पडल्याने‎ युवकाचा मृत्यू की हत्या

अकोला‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी‎ तालुक्यातील तळणी येथील अरबाज‎ खान इस्माइल खान वय २२ हा युवक‎ वाशीम बायपासवरील हुसैनिया‎ मदरशा येथे एक कोर्स करत होता. १‎ जानेवारीला सकाळी ५ वाजताच्या‎ दरम्यान सर्वोपचार रुग्णालयात भरती‎ केले होते. त्यांच्या सहकाऱ्यांनी‎ उपचार करणाऱ्या डॉक्टरांना सांगितले‎ की अरबाज खान दुचाकीवरून‎ पडल्याने डोक्याला मार लागला आहे.‎

मात्र डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी‎ जुने शहर पोलिसांना माहिती दिली.‎ त्यानंतर जुने शहर ठाण्याचे ठाणेदार‎ सेवानंद वानखडे यांनी गंभीरपणे‎ दखल घेत सर्वोपचार रुग्णालय‎ गाठले. त्यांनतर मृतदेहाचे‎ शवविच्छेदन करण्यात आले. आता‎ या शवविच्छेदन अहवालावरून‎ पोलिसांना हत्येचा संशय आहे. त्या‎ दिशेने पोलिस आणखी काही‎ डॉक्टरांचा सल्ला घेत आहेत. या‎ प्रकरणात आधीच पोलिसांनी‎ आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.‎ गुरुवारी उशिरापर्यंत या प्रकरणी‎ पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता.‎

बातम्या आणखी आहेत...