आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांना आर्थिक भुर्दंड:महापालिकेच्या शहर बस वाहतूक सेवा देणाऱ्या संस्थेकडे 2 कोटी 40 लाख रुपयाचे कर्ज थकीत

अकोला22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनामुळे मागील दोन वर्षापासून ठप्प असलेल्या शहर बस वाहतुक सेवा देणाऱ्या संस्थेवर दोन कोटी 40 लाख रुपयाचे कर्ज झाले आहे. 2 वर्षापासून वाहतुक सेवा बंद असल्याने संस्थेने कर्जाच्या हप्त्याची परतफेड केलेली नाही. त्यामुळे यावर तोडगा न काढल्यास शहर बस वाहतुक सेवा पूर्णपणे बंद होण्याची शक्यता आहे. यामुळे सर्व सामान्य नागरिकांना मात्र आर्थिक भूर्दुंड सहन करावा लागत आहे.

महापालिकेने शहराच्या विविध मार्गावर नागरिकांच्या सोयीसाठी शहर बस वाहतुक सेवा सुरु करण्याच्या हेतूने निविदा प्रसिद्ध केल्या होत्या. यापैकी श्रीकृपा ट्रॅव्हल्स या कंपनीला बस वाहतुक सेवेचे कंत्राट देण्यात आले. संस्थेसोबत झालेल्या करारनामान्य नुसार बसेस महापालिकेच्या नावाने खरेदी करण्यात आल्या. एकुण तिकीट विक्रीवर पाच टक्के रॉयल्टी महापालिकेला देण्याचा करार झाला होता. मात्र कोरोनामुळे मागील दोन वर्षापासून शहर बस वाहतुक सेवा ठप्प आहे. कोरोना नंतरही ही बससेवा सुरु करण्याचा फारसा प्रयत्न झाला आहे. त्यात संस्थेने कोरोना काळात प्रशासनाला बसेस उपलब्ध करुन दिल्या. त्याचे भाडेही प्रशासनाने न दिल्याने बस वाहतुक सेवा सुरु करताना अडचणी येत आहे.

ज्यावेळी बस वाहतुक सेवा सुरु केली. त्यावेळी एक कोटी 85 लाख रुपयाचे कर्ज होते. दरमहा 4 लाख 23 हजार रुपयाचा कर्ज हप्त्याचा भरणा संस्थेने करणे क्रमप्राप्त होते. संस्थेने 70 लाख रुपयाचा भरणाही केला. मात्र कोरोना पासून सेवा बंद झाल्याने कर्ज हप्ता थकला. आता ही रक्कम दोन कोटी 40 लाख रुपयांवर गेली आहे. त्यामुळे 31 सिटरच्या 18 बसेस धुळखात उभ्या आहेत. कर्जाबाबत तोडगा न निघाल्यास नागरिकांच्या सोयीसाठी असलेली ही सेवा पूर्णत: ठप्प होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बातम्या आणखी आहेत...