आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:अनेक लघु प्रकल्पातील जल पातळीत घट; काटेपूर्णात 25.52 तर वानमध्ये 36.70 दलघमी जलसाठा

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एप्रिलपासून तापमानात सातत्याने वाढ झाल्या नतंर देखील जूनच्या प्रारंभी देखील जिल्ह्यातील सर्वात मोठ्या काटेपूर्णा प्रकल्पात २५.५२ तर वान प्रकल्पात ३६.७० दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध आहे. मात्र अनेक लघु प्रकल्पातही जलपातळीत घट झाली असून, पाच लघु प्रकल्प कोरडे पडले आहेत. पुढे पावसाने दांडी मारल्यास येणारे संकट लक्षात घेवून पाण्याची बचत करणे आवश्यक ठरणार आहे.

नोव्हेंबर अखेरपर्यंत पाऊस झाल्याने जिल्ह्यातील मोठे, मध्यम तसेच लघु प्रकल्प ओसंडून वाहिले आहेत. काटेपूर्णा आणि वान या दोन मोठ्या प्रकल्पाचे दरवाजे वारंवार उघडावे लागले होते. जिल्ह्यातील ३६ पैकी जवळपास सर्वच लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झाले होते. जिल्ह्यात दोन मोठे, तीन मध्यम आणि ३६ लघु प्रकल्प आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून अकोला शहरासह विविध गावांची तहान भागवली जाते तसेच हजारो हेक्टर जमिन सिंचनाखाली येते. त्यामुळे या उन्हाळ्यात पाणी टंचाईचा फारसा सामना करावा लागत नसला तरी नासाडी होवू नये, याची खबरदारी घ्यावी, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. तापमानात वाढ झाल्याने पाण्याची मागणी वाढली आहे. त्याच बरोबर बाष्पीभवनातही वाढ झाली आहे.

अन्य पाणी पुरवठा योजनांना होतो पाणी पुरवठा : काटेपूर्णा प्रकल्पाची साठवण क्षमता ८६.३५ दलघमी आहे. यात अकोला शहर, मूर्तिजापूर शहर, ६० खेडी पाणी पुरवठा योजना, ६४ खेडी पाणी पुरवठा योजना आदी विविध पाणी पुरवठा योजनांना पाणी पुरवठा केला जातो. शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी दिले जाते.

पाण्याची नासाडी टाळावी लागणार
काटेपूर्णा प्रकल्पातील उपलब्ध पाण्यावर केवळ अकोला शहराचा अधिकार नाही. अन्य पाणी पुरवठा योजनांनाही पाणी पुरवुठा केला जातो. त्यामुळे पावसाळा लांबल्यास उपलब्ध पाण्यावरच शहराची तहान भागवली जाणार आहे. त्यामुळे पाण्याची नासाडी टाळावी लागणार आहे.

प्रकल्पनिहाय होणारे बाष्पीभवन /दलघमी मध्ये
प्रकल्प उपलब्ध बाष्पीभवन इतर व्यय
२ मोठे प्रकल्प (काटेपूर्णा, वान) १६८.३० २७.७२ ६.३२
३ मध्यम प्रकल्प ८१.९९ २०.५० ००००
३१ लघु प्रकल्प ६८.०९ १६.४७ ००००

प्रकल्पातील जलसाठा/ दलघमी
प्रकल्प क्षमता उपलब्ध
काटेपूर्ण ८६.३५ २५.५२
वान ८१. ९५ ३६.७०
मोर्णा ४१.४६ १५.३०
निर्गुणा २८.८५ ७.५१
उमा ११.६८ १.०६

बातम्या आणखी आहेत...