आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराक्षयरोग नियंत्रणावर यशस्वी काम केल्या बद्दल केंद्र शासनाच्या वतीने जिल्ह्याला कांस्य पदक देण्यात आले. या क्षयरोग नियंत्रणासाठी कार्य करणाऱ्या महापालिका वैद्यकीय चमुचे आयुक्त कविता द्विवेदी यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
जागतिक क्षयरोग दिनानिमित्त केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्यावतीने दिल्ली येथील विज्ञान भवनात आयोजित ‘स्टेप अप टू एन्ड टीबी २०२२’ शिखर परिषदेत क्षयरोग रुग्णांमध्ये लक्षणीय घट घडवून आणणाऱ्या राज्य व जिल्ह्यांना २४ मार्चला सन्मानित करण्यात आले होते.
या वेळी जिल्हा श्रेणीमध्ये महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांना सन्मानित करण्यात आले, ज्यामध्ये अहमदनगर जिल्ह्याला सुवर्ण पदक तर अकोला आणि बीड जिल्ह्याला कांस्यपदकाचा समावेश आहे. अकोला जिल्ह्याच्या वतीने जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हरी पवार आणि अकोला मनपाकडून शहर क्षयरोग अधिकारी डॉ.अस्मिता पाठक यांना कांस्य पदक प्रमाणपत्र व २ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे.
या वेळी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे तर केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया, डॉ.भारती पवार यांच्यासह विज्ञान-तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह आणि निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के.पॉल यांनी विज्ञानभवनात उपस्थिताना संबोधित केले होते. अकोला जिल्ह्याला कांस्य पदक मिळाल्याबद्दल मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांनी त्यांच्या दालनात वैद्यकीय विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रोत्साहन पर पुष्पगुच्छ देवून सन्मान केला.
या वेळी मनपा क्षयरोग विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉ.अस्मिता पाठक, उमेश पद्मने, डॉ.अशिष सालकर, हेमंत भाकरे, शिवराज बबेरवाल, आकाश मनवर, शुभांगी जाधव, प्रतीक गाडगे, सचिन मालोकार, सुमित आवारे, कोमल गावंडे, नितेश वाघमारे, निलेश उत्के, पल्लवी टाले, कांचन बनसोड, अब्दुल कदीर, गोकुल लव्हाळे, संगीता इतवारे उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.