आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकार्पण:अग्निशमन दलातील अॅम्बुलन्स कम रेस्क्यू व्हॅनचे लोकार्पण ; व्हॅनचे वैशिष्ट्य सांगून प्रात्यक्षिक दाखवले

अकोला16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य शासनाच्या नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून महापालिका अग्निशमन विभागाला मिळालेल्या अॅम्बुलन्स कम रेस्क्यु व्हॅनचे आमदारांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. मनपा मुख्य कार्यालयात आमदार अमोल मिटकरी, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार नितीन देशमुख मनपा आयु‍क्त, प्रशासक कविता द्विवेदी यांच्या उपस्थितीत व्हॅनचे लोकार्पण झाले. दीड कोटीच्या या वाहनात ३०० लिटर पाण्याची,५० लिटर फोमची सुविधा असून यात अॅम्यबुल्स सुविधा, ऑक्सिजन सुविधा उपलब्ध आहे. रात्री रेस्क्यूच्या कामासाठी यामध्ये एल.ई.डी.टॉवरची व्यवस्था असून, पूरपरिस्थितीत नागरिकांना रेस्क्यू करण्यासाठी लाईफ जॅकेटची व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस ही रेस्क्यु व्हॅन महत्वाची भूमिका बजावणार आहे. या वेळी उपस्थित मान्यवरांना अग्निशमन विभागाचे विभाग प्रमुख हारूण मनियार, लिडींग फायरमॅन प्रकाश फुलअंबरकर आदी कर्मचाऱ्यांनी व्हॅनचे वैशिष्ट्य सांगून प्रात्यक्षिक दाखवले. या वेळी मनपा उपायुक्त डॉ.पंकज जावळे, पुनम कळंबे, फायर निरीक्षक मनीष कथले तसेच अग्निशमन विभागातील कर्मचारी उपस्थित होते. विभागाकडे शिक्षित कर्मचारी किती? शासनाने अॅम्यबुलन्स कम रेस्‍क्यू व्हॅन दिली आहे. मात्र ही व्हॅन आपत्ती काळात प्रत्यक्षात कामी येण्यासाठी महापालिका अग्निशमन विभागाकडे किती कर्मचारी शिक्षित आहेत? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.शासनाकडून मिळालेल्या अॅम्बुलन्स कम रेस्क्यु व्हॅनचे प्रात्यक्षिक आमदारांसमोर देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...