आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिमोग्लोबिन:पोषक आहाराअभावी महिलांमध्ये आढळते हिमोग्लोबिनची कमतरता

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बदलत्या खानपानाच्या सवयींमुळे बहुतांश महिलांमध्ये अॅनिमिया किंवा हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी आढळून येते. दिवसेंदिवस ही समस्या गंभीर होत अाहे, अशी माहिती स्त्रीरोगतज्ज्ञ देतात. त्यामुळे महिलांनी हिमोग्लोबिनविषयी जागृत राहून पोषक आहाराकडे लक्ष द्यावे, असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.खानपानाकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे शरीराला पोषक तत्वे मिळत नाहीत. त्याचा परिणाम मानवी शरीरावर होतो.

यातूनच अनेक समस्या उद्भवतात. विशेष म्हणजे पोषणाच्या अभावाने महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी आढळते. खानपानाविषयी जागृती करण्यासाठी १ ते ७ सप्टेंबरदरम्यान राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर ही माहिती दिली.

हिमोग्लोबिन किती असावे?
तज्ज्ञांच्या मते महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण हे १३ ते १४ असणे आवश्यक आहे. सामान्यपणे हे प्रमाण बहुतांश महिलांमध्ये ९ ते १० एवढे आढळते. सरासरी ६० टक्के महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी आढळते.

गर्भवती महिलांनी जागृत राहावे
खानपानाच्या बदलल्या सवयींमुळे शरीरात लोहाची मात्र कमी होते. परिणामी हिमोग्लोबिनची कमतरता आढ‌ळून येते. म्हणून सर्व महिलांनी पोषक आहार घेणे अत्यावश्यक असते. गर्भवती महिलांमध्ये हिमोग्लोबिनची आवश्यकता अधिक असते. त्यामुळे आहाराविषयी जागृक राहिले पाहिजे. - डॉ. श्यामकुमार सिरसाम, स्त्रीरोगतज्ज्ञ, जीएमसी, अकोला.

बातम्या आणखी आहेत...