आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय पोषण सप्ताह:पोषक आहाराअभावी महिलांमध्ये आढळते हिमोग्लोबिनची कमतरता ; 60 टक्के महिलांचा समावेश

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बदलत्या खानपानाच्या सवयींमुळे बहुतांश महिलांमध्ये अॅनिमिया किंवा हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी आढळून येते. दिवसेंदिवस ही समस्या गंभीर होत आहे, अशी माहिती स्त्रीरोगतज्ज्ञ देतात. त्यामुळे महिलांनी हिमोग्लोबिनविषयी जागृत राहून पोषक आहाराकडे लक्ष द्यावे, असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.

खानपानाकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे शरीराला पोषक तत्वे मिळत नाहीत. त्याचा परिणाम मानवी शरीरावर होतो. यातूनच अनेक समस्या उद्भवतात. विशेष म्हणजे पोषणाच्या अभावाने महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी आढळते. खानपानाविषयी जागृती करण्यासाठी १ ते ७ सप्टेंबरदरम्यान राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर स्त्रीरोगतज्ज्ञ सांगतात की, देशातील अनेक महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी आढळते. याचे प्रमाण सुमारे ६० टक्के असू शकते. महिलांमधील आजाराकडे दुर्लक्ष पोषक आहाराचा अभाव या दोन प्रमुख कारणांमुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी दिसून येत असल्याचे अभ्यासक सांगतात.रक्तक्षय म्हणजे रक्तातील हिमोग्लोबीन कमी होणे. यामुळे रक्ताची ऑक्सिजन वहन करण्याची क्षमता कमी होते. परिणामी शरीरातील इतर पेशींना मिळणारा ऑक्सिजनही कमी होतो. यातून अवयवांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. ही समस्या महिलांसह मुलांमध्ये गंभीर होत असल्याचे दिसून येते. अनेकदा अॅनिमिया हा आहारातील लोहाच्या कमतरतेमुळे होतो.

गर्भवती महिलांनी जागृत राहावे खानपानाच्या बदलल्या सवयींमुळे शरीरात लोहाची मात्र कमी होते. परिणामी हिमोग्लोबिनची कमतरता आढ‌ळून येते. म्हणून सर्व महिलांनी पोषक आहार घेणे अत्यावश्यक असते. गर्भवती महिलांमध्ये हिमोग्लोबिनची आवश्यकता अधिक असते. त्यामुळे आहाराविषयी जागृक राहिले पाहिजे. - डॉ. श्यामकुमार सिरसाम, स्त्रीरोगतज्ज्ञ, जीएमसी, अकोला.

बातम्या आणखी आहेत...