आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांना त्रास:शहरात लोणटेक नाल्यावर‎ कर्ल्व्हट बांधण्याची मागणी‎

अकोला‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पार्वती नगर भागातून लोणटेक हा‎ मोठा नाला वाहतो. पार्वती नगर‎ भागातील जाणता राजा चौकातून‎ भिरड ले-आऊटकडे जाण्याचा‎ मार्ग आहे. मात्र या मार्गा दरम्यान‎ लोणटेकचा नाला गेलेला आहे. या‎ नाल्यावर कर्ल्व्हट (लहान पुल)‎ अद्यापही बांधण्यात आला नाही. ताे‎ बांधण्याची मागणी नागरिकांनी‎ केली आहे.‎लहान पूल नसल्यामुळे या‎ भागातील नागरिकांना जुन्या‎ बाळापूर रोडवर तसेच भिरड‎ ले-आऊट भागात फेऱ्याने जावे‎ लागते. लोणटेक नाल्यावर अन्य‎ ठिकाणी कर्ल्व्हट बांधण्यात‎ आलेले आहेत. मात्र या ठिकाणी‎ कर्ल्व्हट बांधण्यात आलेले नाही.‎ त्यामुळे नागरिकांना त्रास सहन‎ करावा लागत आहे.‎