आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लस:कोविशिल्ड लसीच्या पाच‎ हजार डोसेसची मागणी‎

अकोला‎23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात सुरू असलेल्या‎ कोरोना प्रतिबंधक लसीकरण‎ मोहिमेत कोविशिल्ड लसीचा‎ साठा संपुष्ठात आला आहे.‎ जिल्ह्यासाठी पाच हजार‎ डोसेसची उपलब्धा करून‎ द्यावी, अशी मागणी करण्यात‎ आली आहे. पुढील‎ आठवडाभरात लसीचा साठी‎ प्राप्त होणार आहे, अशी माहिती‎ आरोग्य अधिकाऱ्यांकडून‎ देण्यात येत आहे. या संदर्भात‎ आराेग्य विभागातील सूत्रांकडून‎ मिळालेल्या माहितीनुसार‎ कोविशिल्ड लसीला फार‎ मागणी नसली तरी नोकरी‎ प्रवासाच्या निमित्त अनेकांना‎ लसीकरण पूर्ण झाल्याचे‎ प्रमाणपत्र हवे असल्याने काही‎ प्रमाणात लोक लसीकरणासाठी‎ येतात.

पण कोविशिल्ड लसीचा‎ साठा उपलब्ध नसल्याचे‎ सांगण्यात येते.‎ दरम्यान जिल्ह्याने आरोग्य‎ यंत्रणेमार्फत कोविशिल्ड या‎ लसीची मागणी केली असून,‎ आठ दिवसात कोविशिल्ड‎ लसीचे डोसेस प्राप्त होऊ‎ शकतात. इतर लसी आवश्यक‎ त्या प्रमाणात उपलब्ध आहेत.‎ मात्र ड्यू डोसचे प्रमाण अधिक‎ असल्याने नागरिकांना‎ लसीकरण करून घेण्याचे‎ आवाहन करण्यात येत आहे.‎

बातम्या आणखी आहेत...