आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुकानांमध्ये गर्दी:राष्ट्रध्वजाच्या मागणीबरोबर पुरवठ्यातही वाढ; दुकानांमध्ये झाली गर्दी

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त यंदा अकोलेकरांनी घरोघरी तिरंगा ध्वज फडकावला आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यापासून नागरिकांनी ध्वज घेण्यास सुरुवात केली होती. रविवारीही अनेकांनी घर, दुकान, वाहनांवर लावण्यासाठी ध्वज घेतला. दरम्यान रविवारी मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याने तिरंगी ध्वजांचा पुरवठाही वाढल्याचे शहरातील कापड विक्रेत्यांनी सांगितले आहे.

सोमवारी स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी झेंडावंदन होत असल्याने संपूर्ण शहर तिरंगी ध्वजाने सजले आहे. शाळा, महाविद्यालयांकडून हर घर तिरंगा अभियानानिमित्त विविध कार्यक्रम घेऊन व्यापक जनजागृती करण्यात आली. दरम्यान शनिवारी रात्री काही ठिकाणी ध्वज उपलब्ध होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे होते.

तुटवडा नाही
खासकरून जिल्ह्यात इतरत्र खादी ध्वजांची कमतरता भासू शकते. मात्र आम्ही स्वत:च बारोमास मागणीनुसार निर्मिती करत असल्याने ध्वजाची कमतरता नाही. जशी मागणी वाढते तसा पुरवठाही सुरू आहे. रविवारी दिवसभर नागरिकांची ध्वज घेण्यासाठी गर्दी दिसून आली.
पंकज कागलीवाल, खादी विक्रेते.

बातम्या आणखी आहेत...