आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादारूबंदी करा, दरमहा गृहिणी भत्ता द्या, अशा घाेषणा देत महिलांनी जागतिक महिला िदनानिमित्त बार्शीटाकळी तालुक्यातील पिंपळगाव येथे महिलांनी ठराव घेतले. तसेच गावात स्वच्छता माेहिमही राबवण्यात आली. विविध मागण्यांसाठी जनजागरण करण्याचा निर्णय घोषित केला आणि कृती समितीच्या निमंत्रकपदी पंचफुलाबाई अंभोरे यांची निवड करण्यात आली.
महिलांच्या आक्रोश आंदोलनाला शेतकरी बचाओ आंदोलनाचे प्रमुख संयोजक भाई रजनीकांत यांनी मार्गदर्शन केले. ग्राम स्वच्छता अभियानातही त्यांनी महिलांसाेबत सहभाग नाेंदवला. ग्रामसफाई व महिलांच्या मागण्यांच्या आंदाेलनाचे नेतृत्व निर्मला सुरडकर यांनी केले. यात सीमा सुरडकर, रमाबाई सुरडकर, अनुसया अंधारे, मंदाबाई येवले, वनिता गांजरे, मनोरमा अंधारे, चंद्रकला राठोड, सावित्रीबाई जाधव, भीमराव सुरडकर, संतोष अंधारे, गजानन अंधारे, राष्ट्रपाल अंधारे यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले हाेते, अशी माहिती देण्यात आली.
हे ठराव झाले मंजूर
कार्यक्रमात िवविध मागण्यांचे ठराव मंजूर करण्यात आले. यात विषारी वैध, अवैध दारु बंद झालीच पाहिजे, एसटी बस सुरु करा, महिलांना पुरुषाप्रमाणे सन्मान व समान वेतन द्या, जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी कायदा करावा, केंद्र सरकारने महिलांच्या घरकामाची देशाच्या सकल उत्पन्नामध्ये नोंद करावी, महिलांना घरकामाचा गृहिणी भत्ता म्हणून किमान दरमहा १० हजार रुपये मिळावे, वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानाची भरपाई देण्यात यावी आदींचा समावेश हाेता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.