आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरणपूरक गणेश मूर्तिकडे भक्तांचा ओढा:शाडू माती, कागदाचा लगदा आणि पंचगव्यांच्या मूर्तीला मागणी

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणरायांच्या आगमनाला अवघे काही दिवस राहिले आहेत. गणपतीच्या सुबक आणि आकर्षक मूर्ती घडवण्याचे काम अखेरच्या टप्प्यात आहे. मागील काही वर्षांत पीओपीच्या मूर्तींना पर्याय म्हणून शाडूच्या मूर्ती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सर्व स्तरांतून सुरू आहे. त्यामुळे भक्तांची पर्यावरणपूरक मूर्तींची मागणीही वाढली आहे. शाडूच्या मातीच्या मूर्ती, कागदाच्या लगद्यापासून बनविल्या जाणाऱ्या गणेश मूर्तींकडे भक्ताचा ओढा वाढला आहे. यावर्षी अकोल्यात पंचगव्यापासून तयार मूर्तिही उपलब्ध झाल्या आहेत.

देशी गाईच्या शेणापासून मूर्तिची निर्मिती

अकोल्यात आदर्श गोसेवा एवं अनुसंधान प्रकल्प, तसेच अन्य गोसेवा संस्थांकडून गोमय गणेश मूर्ती विक्रिसाठी विविध दुकानांमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. देशी गाईच्या शेणापासून निर्मित या पर्यावरणपूरक मूर्ती आहेत. 7 ते 9 इंचपर्यंत मूर्तिंचा आकार आहे. 250 ते 350 रूपये यांची किंमत आहे. वजनाने अतिशय हलक्या मूर्ती आहेत. पण दिसायला तेवढ्याच देखण्या आहेत.

मातीच्या मूर्तिंना शहरात, तसेच बाहेरही मागणी

अकोल्यातील पर्यावरणप्रेमी मूर्तिकार अनेक वर्षापासून शाडू मातीपासून गणेश मूर्ती साकारण्याचे काम करीत आहेत. मुख्य म्हणजे भक्तांकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे त्यांचा उत्साह आणखी वाढला आहे. या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना अकोल्यातच नाही, तर इतर शहरांतून मागणी वाढत आहे. अकोल्यात तयार झालेल्या आकर्षक आणि सुबक मूर्ती बंगलोर आणि थेट दुबईपर्यंत पोचल्या आहेत. दरवर्षी गणेश बाहेर राज्यातूनही फोन करून मूर्तिकारांकडे मूर्तीचे बुकिंग करतात.

कागद, पर्यावरणपूरक रंगाचा वापर

यावर्षी बाजारात 8 इंच उंचीपासून थेट अडीचफूट उंचीच्या शाडूच्या गणेशमूर्ती विक्रीसाठी आहेत. शाडूची माती आणि वजनाने अतिशय हलका असणारा कागदाचा लगदा वापरून तयार केलेल्याही मूर्ती आहेत. या मूर्ती वजनाला हलक्या आणि सुबक आहेत. या मूर्तींसाठी वापरण्यात येणारे रंगदेखील पर्यावरण पूरक आहेत. पर्यावरणपूरक मूर्त्यांना प्रचंड मागणी असते, त्यामुहे मुर्तीसाठी 1 महिन्यापासूनच मूर्तींचे बुकिंग सुरु झाल्याचे स्थानिक मूर्तिकार कल्पना राव सांगतात.

बातम्या आणखी आहेत...