आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Demand For Teachers 'salary Before Eid, Letter From The Teachers' Committee To The Chief Accounts And Finance Officer | Marathi News

दिव्य मराठी विशेष:ईदपूर्वी वेतनाची शिक्षकांची मागणी, शिक्षक समितीच्या वतीने मुख्य लेखा - वित्त अधिकाऱ्यांना पत्र

अकोलाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

या महिन्यात १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आिण त्यानंतर येणाऱ्या मुस्लमि बांधवांच्या पवित्र ईदच्या पृष्ठभूमीवर शिक्षकांचे वेतन तातडीने करण्याची मागणी शिक्षक समितीने जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांना सादर केलेल्या नविेदनात केली आहे.

नियुक्ती, भरती, बदली प्रक्रियेत शिक्षण विभाग नेहमीच चर्चेत असतो. अनेक प्रकरणांमध्ये अधिकारी-कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाईही करण्यात आली होती. अशातच शिक्षकांना वेळेवर वेतन मिळण्यासाठी प्रशासनाची पत्रव्यवहार करावा लागतो. अनेकदा तर ५ सप्टेंबर या शिक्षक दिनापर्यंतही मागील महिन्याचे वेतन होत नाही. शिक्षकांसाठी शिक्षक दिन ‘दीन’च होतो. सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीची तयारी आिण पवित्र रमजान महिना सुरु आहे. त्यामुळे या दोन्ही उत्सवाच्या नमिित्ताने तरी वेतन वेळेवर व्हावे, अशी अपेक्षा शिक्षकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत शिक्षक समितीचे प्रभारी जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख व शिक्षक सहकारी पतसंस्था संचालक मारोती वरोकार यांनी मुख्य लेखा व वित्त अधिकारी विद्या पवार यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन सादर केले.

कारवाई का होत नाही ?
शिक्षकांचे पगार वेळेवर होण्यासाठी शासनाने एका निर्णयान्वये जि. प.ला यापूर्वीच आदेश दिलेत. यात वेतन देयके तयार करण्यापासून ते वेतन शिक्षकांच्या खात्यात जमा करण्यापर्यंतची कार्यपद्धती निश्चित करून देण्यात आलेली आहे. यात अनियमितता करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेशसुद्धा देण्यात आले आहेत. मात्र तरीही अनेकदा शिक्षकांना वेळेवर वेतन मिळावे, यासाठी पाठपुरावा करावा लागतो.