आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामनपाच्या अतिक्रमण विभागाने रस्त्यावर अनेक वर्षांपासून रोजगार करणारे फेरीवाले व हॉकर्स यांना रस्त्याच्या कडेस रोजगार करण्यास आळा घालून त्यांच्या कडून दैनिक पावतीचे पैसे घेऊन मोहीम राबवून त्यांचे साहित्य नष्ट करने सुरू केले आहे.
या विरोधात महानगरातील सर्व फुटपाथ विक्रेते मनपा कार्यालयासमोर आंदोलन करुन आपल्या उदर निर्वाहाचा प्रशासनास जाब विचारणार असल्याचा इशारा सर्वधर्मसमभाव फुटपाथ व फेरीवाला संघटनचे अध्यक्ष घनश्याम भटकर यांनी दिला.
शासकीय विश्रामगृहात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत भटकर यांनी मनपा प्रशासन रस्त्यावरील फुटपाथ विक्रेत्यांवर करीत असलेल्या अन्यायाचे निवेदन केले.यावेळी,जयंत अग्रवाल,एड अर्चनाताई गावंडे,संघाच्या महिला अध्यक्ष मनकर्णा बाई इंगळे आदी उपस्थित होते.
महानगराचा आकार दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे फुटपाथ विक्रेत्यांची संख्या ही जोमाने वाढायला लागली आहे. तत्कालीन आयुक्त संजय कापडणीस यांनी या संदर्भात महानगरात 26 हॉकर्स झोन निर्माण करण्याची घोषणा केली होती. काही ठिकाणी असे झोन तयार करण्यात आले.मात्र दोन वर्ष झाली तरी सर्व काम ठप्प असून हा प्रश्न व हा प्रकल्प साकार होऊ शकला नाही.
जेमतेस दोन हॉकर्स झोन आजमितीस उपलब्ध असून त्यात महानगरातील सर्व हॉकर्स समावणे शक्य नसल्यामुळे अनेक हॉकर्स रस्त्याच्या कडेस आपला रोजगार करून उदरनिर्वाह करीत आहेत.मात्र हल्ली मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांच्या नेतृत्वात महानगरात अतिक्रमण मोहीम सुरू करून या मोहिमेची विज केवळ रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या गरीब फेरीवाले व फुटपात विक्रेत्यावर पडून त्यांचे साहित्य नष्ट करून त्यांना रोजगारापासून वंचित ठेवल्या जात आहे.
अतिक्रमण पथकाने अनेक फुटपाथ विक्रेत्यांचे साहित्य नष्ट केले आहे. अशामुळे अशा वर्गात आर्थिक चणचण निर्माण होऊन कुटुंबाची पोट भरण्याची दुरवस्था निर्माण होत आहे. एकीकडे मनपा प्रशासन अतिक्रमण म्हणून राबवून फुटपाथ विक्रेत्यांना हद्दपार करीत आहे तर दुसरीकडे त्यांच्याकडूनच बाजार वसुली पथक दैनिक पावती घेऊन त्यांना व्यवसाय करण्याची परवानगी देत आहे.
अशा द्विध्वस्थितीत फेरीवाले व हॉकर्स अडकले असून यापुढे कोणताही फेरीवाला अथवा रस्त्याच्या कडेने विक्री करणारा विक्रेता दैनिक पावती मनपा प्रशासनाला देणार नसल्याची घोषणा भटकर यांनी करून लवकरच मनपा प्रशासनावर महानगरातील फेरीवाले व हॉकर्स यांचा महामोर्चा आयोजित करण्यात येणार असल्या इशारा यावेळी दिला.
मनपा प्रशासनाने अश्या वर्गाचा अंत न पाहता त्यांना स्वतंत्र हॉकर्स झोन उपलब्ध करून त्यांचे पुनर्वसन करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.संघटनचे सचिव उदयभान जामनिक, सल्लागार सदस्य डॉ सय्यद राजीक, अबरार खान, सय्यद शब्बीर समवेत बहुसंख्य फुटपाथ विक्रेते उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.