आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन‎:सम्राट अशोक ब्रिगेडची मागणी; निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन‎

अकोला‎10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चलनी नोटांवर भगवान बुद्ध, सम्राट अशोक यांची प्रतिमा मुद्रीतकरावी, पंढरपूर, परळी‎ वैजनाथसह अन्य मंदिराचे‎ उत्खनन करण्यात यावे, अशी‎ मागणी सम्राट अशोक ब्रिगेडने ‎निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांना मुख्यमंत्र्यांच्या नावे‎ सादर केलेल्या निवेदनात केली. ‎ ‎ सम्राट अशोक ब्रिगेडच्या ‎निवेदनानुसार प्राचीन काळापासून जगभर भारताची ओळख भगवान ‎बुद्धांचा देश म्हणून आहे. लुंबिनी,‎ सारनाथ, बोधगया ,कुशी नारा,‎ राजगृह ही ठिकाणे बौद्ध धर्मियांची‎ पवित्र स्थळे आहेत.

भगवान‎ बुद्धांचा धम्म जगभर प्रसार‎ करण्यात भारताचे पहिले महान‎ चक्रवर्ती सम्राट अशोक यांचे‎ महत्वपूर्ण योगदान आहे. भारताची‎ ही प्रतिष्ठा आणि गौरव वृद्धिंगत‎ होण्यासाठी सम्राट अशोक‎ ब्रिगेडतर्फे विविध मागण्या‎ करण्यात आल्या. मागण्या पूर्ण न‎ झाल्यास आंदोलन करण्यात‎ येईल, असा इशाराही देण्यात‎ आला. निवदेन देताना प्रा. विजय‎ आठवले, प्रा. सुरेश मोरे‎ जिल्हाध्यक्ष निरंजन वाकोडे, प्रा.‎ डॉ. बाळकृष्ण खंडारे, प्रभाकर‎ कवडे, बाबुलाल डोंगरे, मंदा‎ सिरसाट, श्रीकृष्ण घ्यारे, प्रा.‎ शैलेश इंगळे, सुनील कांबळे,‎ रेखा गोपनारायण आदी‎ पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित‎ होते.‎

या केल्या मागण्या‎ १) सम्राट अशोक यांच्या‎ प्रतिमा ,जिल्हाधिकारी कार्यालय‎ ते ग्रामपंचायत कार्यालय, शाळा,‎ महाविद्यालये सर्व सरकारी,‎ निमसरकारी कार्यालयात लावा‎ व्यात.‎ २) भारतीय चलनी नोटांवर‎ भगवान बुद्ध ,सम्राट अशोक , डॉ‎ बाबासाहेब आंबेडकर या‎ महामानवाच्या चित्रे, प्रतिमा‎ छापण्यात याव्यात.‎३) सम्राट अशोक कालीन‎ मोफत आणि सक्तीच्या‎ शिक्षणाचा नालंदा पॅटर्न‎ राबवण्यात यावा.‎ ४) पंढरपूर,परळी वैजनाथसह‎ तिरुपती, जगन्नाथ पुरी आदी‎ मंदिरांचे उत्खनन करण्यात यावे‎ आणि सत्य माहिती समोर‎ आणावी.‎ ५) कार्ला बुद्ध लेणीसह अन्य‎ ठिकाणी झालेली इतर धर्मियांची‎ अतिक्रमणे हटवण्यात यावी.‎ ६) नाशिक लेणी पांडव लेणी‎ नसून, बुद्ध लेणी आहे, तसे‎ घोषित करावे.‎ ७) महागडे शिक्षण थांबवावे‎ ,शिक्षणाचे खासगीकरण‎ थांबवण्यात यावे.‎

बातम्या आणखी आहेत...