आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा परीक्षेसाठी योजना राबवा;:आदविासी विद्यार्थांची मागणी, जिल्हाधिकारी कार्यालयासामोर धरणे; प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आदीवासी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेसारखे उपक्रम, योजना राबवण्यासह अन्य काही मागण्यांसाठी आदविासी विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. एकात्मक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत विद्यार्थ्यांसाठी योजना राबवण्यात येतात. या विद्यार्थ्यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना नविेदन सादर करत बुधवारी धरणे आंदोलन केले. अकोल्यात आदविासी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेसारखे नविासी शिक्षण, प्रशिक्षण उपक्रम राबवणे आवश्यक आहे. असे उपक्रम राबवल्यास विद्यार्थ्यांना शैक्षणिक विकास होण्यास मदत होईल. यावर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.

‘या’ आहेत मागण्या : आदविासी विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय सुरू करण्यात यावे. आदविासी प्रकल्पांमध्ये होत असलेल्या कंत्राटी पदभरतीमध्ये केवळ आदविासी विद्यार्थ्यांना लाभ देण्यात यावा. प्रकल्प कार्यांअंतर्गत आदविासी विद्यार्थ्यांसाठी जाहीरात पोर्टल तयार करून योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यात यावी. शबरी महामंडळातर्फे १० हजार आदविासी कुटुंबांना घरकुल देण्यात यावे. अकोल्यातील आदविासी विद्यार्थ्यांसाठी भाड्याच्या इमारती बंद करून शासकीय इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात यावे.

बातम्या आणखी आहेत...