आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाेकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांचा सहभाग:ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी;शिवसेनेचे आंदोलन, मूर्तिजापुरात ताेडफाेड

अकाेला11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा खरीप हंगामात सततच्या पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, आेला दुष्काळ जाहीर करण्यासह अन्य मागण्यांसाठी शिवसेनेकडून साेमवारी रास्ता राेकाे आंदाेलन करण्यात आले. हे आंदाेलन सात तालुक्यात एकाच िदवशी एकाच वेळी ४१ ठिकाणी झाले. आंदाेलनादरम्यान मूर्तिजापूर येथील िवमा कंपनीच्या कार्यालयात संतप्त आंदाेलकांनी खुर्च्यांसह अन्य साहित्याची ताेडफाेड केली. आक्रमक आंदाेलकांमुळे वाहतुकीची काेंडी झाली हाेती.

यंदा जून, जुलै, आॅगस्ट, सप्टेंबर, आॅक्टाेबरमध्ये पाऊस झाला. त्यानंतर आॅक्टाेबरमध्ये परतीच्या पावसानेही धुमाकूळ घातला. पावसामुळे कापूस, साेयाबीनसह अन्य पिकांची हानी झाली. एक लाख ४४,४४१ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, िज.प. गट नेते गाेपाल दातकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात केली हाेती. दरम्यान २१ नाेव्हेंबरला जिल्ह्यात आंदाेलन केले.

जिल्ह्यात या ठिकाणी करण्यात आले आंदाेलन
जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातील िनवडक महत्त्वाच्या ठिकाणी रास्ता राेकाे आंदाेलन केले. यात अकाेट तालुक्यात पणज, देवरी फाटा, माेहाळा, सावरा, वरूर जऊळका, मुंडगाव, चाेहाेट्टा. बार्शीटाकळी तालुक्यात कान्हेरी सरप, दगडपारवा, िपंजर. मूर्तिजापूर तालुक्यात लाखपुरी, हातगाव, अनभाेरा, गाझीपूर, कुरुम, कंझरा, जामठी फाटा, हिरपूर फाटा. अकाेला तालुक्यात घुसर, उगवा फाटा, कापशी राेड, माझाेड, सांगळूद, कुंभारी, दहिहांडा, बाभूळगाव, दहिगाव गावंडे. बाळापूर तालुक्यात िनंबा फाटा, वाडेगाव, व्याळा, पारस, िनमकर्दा, देगाव. पातूर तालुक्यात सस्ती, आलेगाव, चान्नी, खानापूर राेड. तेल्हारा तालुक्यात हिवरखेड, बेलखेड, माळेगाव बाजार, भांबेरीचा समावेश हाेता.

बातम्या आणखी आहेत...