आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरक्षा प्रदान:तेलंगणातील आमदार टी.राजासिंह यांना सुरक्षा प्रदान करण्याची मागणी

अकाेलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तेलंगणा येथील गोशामहलचे आमदार टी. राजा सिंह यांना तात्काळ सशस्त्र सुरक्षा देण्यात यावी आणि त्यांना ठार मारण्याची धमकी देणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी,’ अशी मागणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी सरकारकडे केली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना हिंदू जनजागृती समितीचे निवेदन सादर केले.

आमदार टी. राजा सिंह यांचे घर जाळण्याची धमकी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी दिली हाेती. याप्रकरणी काँग्रेसचे स्थानिक नेते फिरोज खान आदींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे हिंदु जनजागृती समितीतर्फे करण्यात आली आहे. तसेच तेलांगणा सरकार पक्षपाती असल्यामुळे टी. राजा सिंह यांना न्याय मिळण्याची शक्यता नसल्याने त्यांच्या वरील खटले महाराष्ट्र, कर्नाटक किंवा गोवा राज्यात हस्तातंतरीत करण्यात यावेत, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

कारागृहातही जीवाला धाेका ज्या कारागृहात टी. राजा सिंह यांना ठेवण्यात आले आहे, तेथे आधीपासून आतंकवादीही अटकेत आहेत. त्यांच्यामुळे राजा सिंह यांच्या जीवाला धोका असल्याने त्यांना योग्य सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांतर्फे अधीक्षक पागोरे यांनी स्वीकारले. या वेळी हिंदू जनजागृती समितीचे अजय खोत, अधिवक्ता श्रुती भट, रणरागिणी शाखेच्या अश्विनी सरोदे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे अकोला विभाग प्रमुख प्रा. हरिदास ठाकरे, संजय केंदळे उपस्थित होते. दरम्यान हिंदू एकता मंच या संघटनेच्या वतीने टी. राजा सिंह ठाकूर यांची मुक्तता करुन त्यांना तत्काळ झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्यात यावी, अशी मागणी वेगळ्या निवेदनाद्वारे करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...