आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन सादर:प्राध्यापकांच्या विविध प्रलंबित समस्या सोडवण्याची मागणी ; विद्यापीठाच्या कुलगुरुंकडे मागणी

अकोला25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर टीचर्स असोसिएशन अर्थात डाटाच्या वतीने विभागातील पाचही जिल्ह्याच्या वतीने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलिप मालखेडे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले की, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत येणाऱ्या अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांमधील प्राध्यापकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामध्ये पदोन्नती संदर्भात डावलने किंवा पदनिश्चितीत विलंब करणे, शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या विविध कोर्सेसकरिता महाविद्यालय प्रशासनाकडून अडवणूक करणे आदी अनेक समस्या आहेत. प्रत्येक महाविद्यालयात अन्याय प्रतिबंध समिती स्थापन करुन सक्रिय रित्या कार्यान्वित करणे, पदनिश्चिती तसेच स्थाननिश्चिती व इतर समितीवर तेच ते प्रतिनिधी न पाठवता इतरही पात्र प्राध्यकांना कुलगुरु प्रतीनिधी म्हणून संधी देणे, पदोन्नती किंवा पदनिश्चिती समितीमधे उपस्थित असलेल्या कुलगुरू यांच्या प्रतिनिधीने त्या उमेदवाराची पदोन्नती किंवा पदनिश्चिती मंजूर झाल्याची शिफारस करून तशाप्रकारचे अप्रूव्हल निर्गमित करावे. याकरिता उमेदवारास स्वतंत्र प्रस्ताव पाठवण्याची गरज भासू नये. याशिवाय दैनिक भत्यात वाढ करावी, तासिका तत्वावर कार्यरत प्राध्यापक व विनाअनुदानित कर्मचारी वर्गाच्या समस्या त्वरित सोडवाव्यात आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. यावेळी विभागीय सदस्य डॉ. कल्याण साखरकर, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रवींद्र मुंद्रे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्राचे संचालक तथा सामाजिक शास्त्राचे अधिष्ठाता डॉ. संतोष बनसोड, अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. कमलाकर पायस प्रामुख्याने उपस्थित होते.

या वेळी कुलगुरुंनी सकारात्मक प्रतिसाद देऊन समस्या निकाली काढण्याबाबत आश्वस्त केले. कुलगुरूंनी डाटाच्या शिष्टमंडळाशी विविध मुद्यांवर दीड तास सकारात्मक चर्चा केली. डाटाचे विभागीय सचिव डॉ. एम. आर. इंगळे यांच्या मार्गदर्शनात यावेळी अकोला जिल्हाध्यक्ष डॉ. प्रसन्नजीत गवई यांच्या नेतृत्वात अकोला जिल्ह्यातून डॉ. संदीप भोवते, प्रा. राहुल घुगे, प्रा. एस. आर. दामोदर, डॉ. ज्ञानशिल खंडेराव, डॉ. कैलास वानखडे, यवतमाळ जिल्हाध्यक्ष डॉ. सागर जाधव यांच्या नेतृत्वात यवतमाळमधून डॉ. चंद्रकांत सरदार, डॉ. शांतरक्षित गावंडे, डॉ. किशोर सुरडकर, अमरावती जिल्ह्यातून डॉ. संजय खडसे, डॉ. कुसवेंद्र सोनटक्के, डॉ. सुरेश गाडे, डॉ. रत्नशिल खोब्रागडे, वाशिम जिल्ह्यातून डॉ. पद्मानंद तायडे, बुलढाणा जिल्ह्यातून प्रा. मिलिंद जाधव आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...