आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘शहरातील धोकादायक ठरलेल्या तीन जलकुंभांना पाडून टाका अथवा तज्ज्ञ एजन्सीकडून त्याची त्वरीत दुरुस्ती करा तसेच जलकुंभांचा वापर केवळ पाच वर्ष करा,’ अशी सूचना अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पथकाने केलेल्या जलकुंभांच्या स्ट्रक्चरल ऑडिट (संरचनात्मक स्थर्ये तपासणी)मध्ये नमूद केले आहे. त्यामुळे दैनिक दिव्य मराठीने २७ ऑगस्टला प्रकाशित केलेले ‘जलकुंभ झालेत धोकादायक’ हे वृत्त खरे ठरले.
शहरात १९७७ मध्ये नवीन बसस्थानकामागील दोन आणि जुने शहरातील शिवनगरात जलकुंभ बांधले होते. २००६ मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून महापालिकेने पाणीपुरवठा योजना स्वत:च्या ताब्यात घेतली. हस्तांतरणाच्या वेळी ‘मजिप्रा’ने हे तीन जलकुंभ क्षतीग्रस्त झाल्याची माहिती दिली होती.
शासकीय महाविद्यालय पथकाने सुचवलेल्या दुरुस्त्या बसस्थानकामागील दोन जलकुंभाला ४५ वर्ष झाले आहेत. जलकुंभाच्या कॉलम आणि बिम मधील लोखंड जंग चढतोय, जलकुंभाच्या आतील प्लॅस्टर काढून नव्याने प्लॅस्टर करा, कॉलम, बिमला पडलेल्या भेगांची दुरुस्ती करावी, कॉलमला जॅकेटिंग (पोलादी शिट) करावी, ब्रेसेसची (कॉलमला जोडणारा कॉलम) या सर्व दुरुस्त्या एक्सपर्ट एजन्सीकडून त्वरित करुन घ्यावा तसेच जलकुंभा खालचा भाग कोरडा करा, कंटेनरला (पाण्याची टाकी) प्लॅस्टर करुन रंग द्यावा, जलकुंभ परिसरातील झाडे काढण्याच्या सूचनाही केल्या आहेत.
महापालिकेला सावधगिरी बाळगावी लागेल सुचवलेली दुरुस्ती नवीन मानकानुसार करावी लागेल. जलकुंभाची स्थिती पाहता सुचवलेल्या उपाय योजना त्वरित करणे गरजेचे आहे. तसेच भुकंपाचे झोन बदलले आहे. आता भूकंप प्रवण क्षेत्रात अकोला जिल्हा काही अंशी आला आहे. त्यामुळे महापालिकेने या तीनही जलकुंभांबाबत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. -बी.एस.लांडे, असोसिएट प्रोफेसर.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.