आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रम:सोयाबीन पिकामधील उगवणपूर्व तणनाशकाचा प्रात्यक्षिक कार्यक्रम

बार्शीटाकळी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील उमरधरी या गावामध्ये एका कंपनीकडून सोयाबीन पिकामधील उगवणपूर्व तणनाशकाचा प्रात्यक्षिक पाहणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी शेतकऱ्यांची माेठ्या संख्येत उपस्थिती होती.या संदर्भात देण्यात आलेल्या माहितीनुसार या तणनाशकाच्या परिणामामुळे शेतामधील तनि्ही प्रकारच्या तणावर नियंत्रण मिळते. शेतातील तणांच्या बियांची संख्या कमी होते. याबाबत १०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना कंपनीचे जिल्हा प्रतनिधिी शत्रुघ्न उपरवट यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात आले.

हा कार्यक्रम दनिकर कवळे यांच्या शेतामध्ये आयोजित करण्यात आला होता. लखमापूर, बहीरखेड, नीहदिा या गावातील शेतकरीही यावेळी उपस्थित होते. माजी सरपंच विकास इंगोले, प्रगतशील शेतकरी योगेश राठोड, प्रमुख पाहुणे गोविंद भारस्कर, कंपनीचे तालुका प्रतनिधिी सुमित मोहोड, उमेश वाघ, योगेश बर्डे, श्याम बोरकर आदींची या वेळी उपस्थिती होती, अशी माहिती एका प्रसदि्धी पत्रकाद्वारे कळवण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...