आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबंडाळीच्या विरोधात आणि शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ सोमवारी २७ जूनला शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरत रॅली काढली. बंडखोर मंत्री, आमदारांविरोधात शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेत घोषणा दिल्या. काळ संकटाचा असला तरी आमचा वारसा संघर्षाचा आहे, अशा आशयाचे फलक रॅलीच्या मार्गावर लावण्यात आले होते. आम्ही सदैव शिवसेना व ठाकरे यांच्या पाठीशी, असे नमूद केलेले फलक हातात घेऊन शिवसैनिक रॅलीत सहभागी झाले होते. रॅलीत नेत्यांनी भाजप आणि बंडखोर मंत्री व आमदारांवर टीकास्त्र डागले.
नगर विकास मंत्री तथा शिवसेनेचे नेते शिंदे यांनी ४० पेक्षा जास्त आमदारांना साेबत घेत बंड केल्याने शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. सोमवारी शिवसैनिकांनी बंडखोरांना इशारा देत शिवसेनेच्या समर्थनार्थ राजराजेश्वर मंदिर ते महाराणा प्रताप चौकापर्यंत रॉली काढली. या रॅलीत आमदार नितीन देशमुख, सहाय्यक संपर्कप्रमुख सेवकराम ताथोड ,जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, विजय मालोकार पश्चिमचे प्रमुख राजेश मिश्रा, अतुल पवनीकर, प्रदीप गुरुखुद्दे, योगेश अग्रवाल, राहुल कराळे, अजय जाधव, दिलीप बोचे, नितीन ताकवाले, ज्योत्स्ना चोरे, मंजुषा शेळके, वर्षा पिसोडे, रेखा राऊत, मुकेश मुरुमकार, रवी पोहरे, विकास पागृत, शाम गावंडे, रवी मुर्तडकर, गजानन मनतकर, संगीत कांबे, आनंद बनचरे,अजय ढोणे, सुनील दंदे, उमेश राऊत, विनायक गुन्हाने , संतोष अनासने यांच्यासह दोन हजारांवर शिवसैनिक सहभागी झाले होते.
स्वपक्षीय बंडखोरांवर टीका : १) रॅलीच्या समारोपप्रसंगी आमदार नितीन देशमुख यांनी बंडखोरांचा समाचार घेतला. बंडखोरांमध्ये हिंमत असल्यास त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीत उतरून दाखवावे. शिवसेना त्यांना अद्दल घडल्याशिवाय राहणार नाही. २) शिवसेनेच्या आमदार यामनिी जाधव यांच्या कुटुंबीय, प्रताप जाधव यांच्यावर केंद्रीय तपासणी यंत्रणांनी कारवाई केली. आमदार दीपक केसरकर हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आले. त्यांना शिवसेनेने राज्यमंत्री पद दिले. मंत्री, राज्यमंत्री पदाची शपथ घेताना नव्हे ; तर आता बंडखोरांना हिंदुत्वाची आठवण झाली आहे. पुढील आठवड्यापासून काय होणार? ः पक्ष बांधणीसाठी शिवसेनेने पुढीलप्रमाणे नियोजन केले आहे. १) शिवसेनेचे संपर्क प्रमुख हे तालुकानिहाय बैठका घेणार असून, ते तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. २) जिल्हा प्रमुख व जिल्हास्तरीय-तालुकास्तरीय प्रमुख हे जिल्हा परिषद सर्कलनिहाय बैठका घेणार आहेत. जिल्ह्यात ५३ सर्कल आहेत. ३) बैठकांमध्ये पक्ष बांधणी, महाविकास आघाडीने जनहितासाठी राबवलेल्या योजना, भविष्यातील योजनांचे नियोजन सांगण्यात येणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.