आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगार हद्दपार:सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील १६४ गुन्हेगार हद्दपार

अकोला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दाेन वर्षांनी निर्बंधमुक्त वातावरणात हाेणाऱ्या विविध सण, उत्सवाच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातून १६४ गुन्हेगारांना हद्दपार करण्याचा आदेश अकाेला उपविभागीय अधिकाऱ्यांनी जारी केला आहे. आगामी काळात कावड पालखी उत्सव, पोळा व कर, श्री गणेश स्थापन आणि विसर्जन मिरवणूक निघणार आहे. या पृष्ठभूमीवर महानगरात शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता अकाेला तालुक्यातील नऊ पोलिस स्टेशन हद्दीतील १६४ गुन्हेगारांना हद्दपार करण्याचे आदेश बजावले आहेत. गुन्हेगार हे दोन, तीन ते चार दिवसांसाठी हद्दपार केले आहेत.

काेराेनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी जिल्ह्यात दाेन वर्षे जाहीर कार्यक्रमांना मर्यादा हाेत्या. मात्र यंदा निर्बंधमुक्त वातावरणात सर्व सण, उत्सव साजरे करण्यात येत आहेत. जिल्ह्यात काही दिवसांमध्ये कावड-पालखीसह गणेशोत्वस, पोळा व कर आणि इतर सण, उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे हाेणार आहेत. उत्सवाच्या काळात असामाजिक तत्वांसह गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नागरिकांनी अशांतता निर्माण करू नये, यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. त्यामुळे अशा गुन्हेगारांना हद्दपार करण्यासंबंधीचा प्रस्ताव उपविभागीय पोलिस अधिकारी व इतर ठाणेदारांनी तयार करून उपविभागीय अधिकारी (एसडीएम) डॉ. नीलेश अपार यांच्याकडे सादर केला होता. सदर प्रस्तावांवर सुनावणी घेतल्यानंतर एसडीएम डॉ. अपार यांनी तालुक्यातील नऊ पोलिस स्टेशन हद्दीतील १६४ गुन्हेगारांना तालुक्यातून हद्दपार करण्याचे आदेश बजावले आहेत. सदर गुंडांना कावड-पालखी उत्सव, पोळा व कर आणि गणेश स्थापन व गणेश विसर्जन या दरम्यान शहरात वास्तव्य करण्यास मनाई करण्यात आली आहे.

कधीपर्यंत राहणार आदेश लागू २१ ते २२ ऑगस्ट दरम्यान, पोळा व कर निमित्त २५ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट दरम्यान, श्री गणेश स्थापना ३० ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान आणि श्री गणेश विसर्जन मिरवणूक काळात ७ सप्टेंबर ते १० सप्टेंबर या चार दिवसांच्या काळात तालुक्यातून १६४ गुंड तडीपार करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...