आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य खाक:बार्शीटाकळीतील आगीत टेन्ट हाऊस साहित्य खाक ; नियंत्रण मिळवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली

बार्शीटाकळी19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील तेलीपुऱ्यातील मंडप डेकोरेशनच्या गोदामाला शनिवारी आग लागल्याने दुचाकीसह मंडप डेकोरेशनचे साहित्य खाक झाले. आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. श्याम वाघमारे यांच्या मंडप डेकोरेशनला शनिवारच्या पहाटे ५.३० च्या सुमारास आग लागली. याची माहिती मिळताच नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी धाव घेतली. पोलिस गोपनीय विभागाचे किशोर पिंजरकर, शरद सांगळे यांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. मात्र, अग्निशमन दलाची गाडी येण्यापुर्वीच दुकानातील सामान आगीत भस्मसात झाले होते. गोदामात वीज पुरवठा नाही. त्यामुळे आग कशी लागली? हा संशोधनाचा विषय आहे. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबाचे रोजीरोटीचे साधन हिसकावले गेले. ते भरून काढणे कठीण असल्याचे, श्याम टेन्ट हाऊस डेकोरेशनचे संचालक गणेश श्याम वाघमारे यांनी सांगितले.त्यामुळे प्रशासनाने नुकसान भरून काढण्यासाठी मदत करण्याची विनंती त्यांनी केली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अनंत केदारे, भारत बोबडे, शिवा नंदखोडके, लक्ष्मण वाघमारे, शुभम अग्रवाल, सौरभ अग्रवाल यांनी सहकार्य केले. काही दिवसांपूर्वीच बार्शीटाकळी येथील स्टेट बँकेच्या इमारतीला आग लागली. यामध्ये इमारतीच्या वरच्या माळ्यावरील पंकज बिअरबार जळून खाक झाले. त्यानंतर आठवडाभरातच ही दुसरी आगीची घटना घडली आहे.

बातम्या आणखी आहेत...