आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘धागा शौर्य का’ राखी अभियाना अंतर्गत विद्यार्थी महिलांनी स्व:हस्ते निर्मित राख्या सीमेवरील सैनिकांना रक्षाबंधन सणानिमित्त पाठविल्या. भारतमातेचे व देशातील बहिणींचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना उत्सवात सहभागी करून घेण्यासाठी हा उपक्रम राबवला.
उत्सवात सहभागासाठी येथील योगेश विजयकर, रंजित घोगरे यांनी ‘धागा शौर्य का’ राखी अभियाना अंतर्गत महिला विद्यार्थी यांना राख्या गोळा करण्यासाठी आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत महिला, जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, ताणखेड येथील विद्यार्थ्यांनी स्व:हस्ते कलेतून निर्मित राख्या गोळा करून व सैनिकांपप्रति आदरभाव पत्र लिहून त्या राख्या पोस्टामार्फत सीमेवर तैनात जम्मू-काश्मीर देहरादून येथील सैनिकांना त्या राख्या पाठवण्यात. येथील पोस्ट ऑफिसमध्ये शुक्रवारी हा कार्यक्रम झाला.
कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य सुषमा प्रशांत ठाकरे अध्यक्षस्थानी होत्या. माजी सरपंच तृप्ती देशमुख, शिक्षिका अनिता पवार, गजानन महाराज विद्यालयाचे अरविंद उगले प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाला कुरणखेड डाग विभागाचे पोस्ट मास्टर दत्तात्रय देशमुख, राजेश चोपडे उपस्थित होते. यावेळी महिला माधुरी देशमुख, रिना बरडे, संजीवनी देशमुख, सविता फाटे, सुशीला लव्हाळे, वनमाला देशमुख, रत्नप्रभा दहीकार, वेनू हरसुलकर, रोशनी गायकवाड, दुर्गा आठवले, दीपा आठवले, प्रमिला मालवे, वंदना कोगदे, वंदना इंगळे, लता चिकार, रोशनी मालाणी, शिल्पा ढोकणे, सारिका धानोरकर, राधिका देशमुख, तेजस्विनी तेलकर, राधिका बोळे, काजल सोनोने, सुनिता घाटे, कल्याणी चिकार, मीरा माल्टे, सिद्धी राऊत, सुगंधा शिंदे, नूतन बाहेकर, आचल चिकार, स्मिता सोनोने, भक्ती तेलकर, उज्वला जाधव, तन्वी तायडे, राधा कुपटकर, कांचन कुपटकर, प्रतिभा राऊत, प्रणाली राऊत, भाग्यश्री देशमुख, सानिका टेकाडे, कांता बोळे, जानवी उमाळे, जयश्री बोळे, आकांक्षा टेकाडे, नीता चिकार, रेखा चव्हाण, साक्षी सोनोने, कोमल उमाळे, स्नेहल कोगदे, सारिका धानोरकर,साक्षी आठवले, ऋचा फाटे, गौरी ढोकणे, गायत्री सदाफळे, निशा चव्हाण उपस्थित होते. कार्यक्रमाला माजी सैनिक, कृषी सहाय्यक प्रदीप बोळे, सैनिक सतीश गायकवाड, सैनिक आकाश कथलकर यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला चंडिका आपत्कालीन बचाव पथक वीरेंद्र देशमुख, संतोष गोगटे, पत्रकार प्रमोद गोगटे, नरेंद्र देशमुख, शुभम चव्हाण, मयूर धानोरकर, कृष्णा सोनोने यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन अरविंद उगले, आभार योगेश विजयकर यांनी व्यक्त केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.