आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्रामीण भागातील कामात भ्रष्टाचाराचा आरोप करीत नौटंकी होत असल्याची टीका करीत सोमवारी वंचित बहुजन आघाडीने तीन ठिकाणी आत्मक्लेश आंदोलन केले. स्वत:च्या स्वार्थासाठी बोगस कामे केली असून, भाजप, शविसेना, प्रहार जनशक्ती पक्षाने जनतेला लुटल्याचा आरोप ‘वंचित’ने केला. रस्ते, पुलांच्या कामातील अनियमिततेप्रकरणी पालकमंत्री कडू यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रहार, वंचित असा वाद रंगला आहे.
जिल्हा नियोजन समितीने जि.प.च्या या प्रस्तावांत परस्पर बदल केल्याचा आरोप वंचित आघाडीच्या नेत्यांनी केला. शासनाच्या १ कोटी ९५ लाखांचा निधीचा अपहाराच्या उद्देशाने बोगस कागदपत्र तयार केले, असा आरोप केला होता. जिल्ह्यातील कामांबाबत पालकमंत्र्यांकडून आश्वासन दिले होते. मात्र रस्त्याची कामे पूर्ण झाली नाहीत, असा आरोप करीत वंचितने ही कामे पूर्ण व्हावीत, यासाठी आत्मक्लेश आंदोलन केले. येथे ‘वंचित’चे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, प्रदीप वानखडे, अरुंधती सिरसाट, राजेंद्र पाताेडे, दिनकरराव खंडारे, आकाश सिरसाट, शंकरराव इंगळे,नीलेश देव, गजानन गवई, सिमांत तायडे,बुद्धरत्न इंगोले,जीवन डीगे,शेख मुस्ताक,मो. रिझवान,मनोहर बनसोड, आनंद खंडारे, सचनि वाकोडे उपस्थित होते.
रस्ते बनले मृत्यूचे सापळे तेल्हारा,बाळापूर, अकोट तालुक्यातील रस्ते बांधकामात भ्रष्टचार झाला असून, हे रस्ते मृत्यूचे सापळे बनले, असा आरोप वंचितने केला. राज्यातील सत्ताधारी लोकप्रतनिधींकडून नौटंकी करण्यात येत असल्याची टीकाही आंदोलकांनी केली.
विकास कामात भ्रष्टाचार
पालकमंत्री कडू यांच्याविरूद्ध न्यायालयाच्या आदेशाने कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल केले. त्यांनी विकास कामात भ्रष्टाचार करून लाखोंची माया जमा केली, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी आंदोलनादरम्यान केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.