आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडिजिटल माध्यमकर्मींनी स्वयंशिस्त व आचारसंहिता पाळावी, असे आवाहन डिजिटल मीडियातील मुंबईतील तज्ज्ञ तथा वरिष्ठ पत्रकार विक्रांत पाटील व विवेक भावसार यांनी केले. श्रमिक पत्रकार संघातर्फे आयाेजित डिजिटल मीडिया कार्यशाळेत त्यांनी डिजिटल तंत्रज्ञानावर विस्तृत विवेचन केले. जग हे डिजिटल मीडियाकडे वेगाने वळत असून, हा बदल तातडीने स्वीकारणे काळाची गरज असल्याचेही ते म्हणाले. डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शेतकरी सदनमध्ये झालेल्या कार्यशाळेत विक्रांत पाटील व विवेक भावसार यांनी डिजिटल मीडियातील विविध पैलूंवर प्रकाशझाेत टाकला. लिखाण कॉपीपेस्ट नसावे. अशा मजकुराच्या प्रसारणावर बंदी येणार आहे. आपला कंटेंट सशक्त व विश्वासार्ह असेल तर आपण डिजिटल मीडियामध्ये उत्तम कामगिरी करू शकतो.
डिजिटल पत्रकारिता, डिजिटल मार्केटिंगचे ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. डिजिटल माध्यकर्मींनी कायद्याचे पालन करणे गरजेचे आहे. बातमी अधिक वाचक, प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी टॅगिंग कसे करावेे, याबाबत मार्गदर्शन केले. डिजिटल मीडियातून सन्मानाने अर्थार्जन शक्य आहे, असेही ते म्हणाले. कार्यशाळेत प्रारंभी तज्ज्ञांचे स्वागत पत्रकार गाेपाल हागे व अतुल जयस्वाल यांनी केले. जिल्हा माहिती अधिकारी डाॅ. मिलिंद दुसाने यांचे स्वागत पत्रकार संजय खांडेकर यांनी केले. सूत्रसंचालन पत्रकार महेश घाेराळे यांनी केले, तर आभार पत्रकार विशाल बाेरे यांनी मानले. बदल स्वीकारा : आेरिजनल कंटेंट देणाऱ्यांना डिजिटल मीडियात प्रचंड संधी आहेत. क्रीडा, कृषी, अन्न-धान्य, सामाजिक, राजकीय व मुख्यत्वेकरून स्थानिक घडामोडींवर लिखाण केल्यास त्याला वाचक-प्रेक्षकांचा प्रतिसाद िमळेल, असेही विवेक भावसार व विक्रांत पाटील म्हणाले. यासाठी प्रत्येकाने चिकाटी व परिश्रम करून वेळ देण्याची तयारी ठेवावी. यातून उत्पन्नही वाढले. आगामी काळ हा डिजिटल माध्यमांचा असून, बदल न स्वीकारल्यास आपण स्पर्धेतून बाहेर पडू, असेही ते म्हणाले.
यावर दिली माहिती
िवक्रांत पाटील व विवेक भावसार यांनी डिजिटल मीडियाबाबत महत्त्वाची माहिती दिली. यात विषयांची मागणीनुसार िनवड, नोंदणी, दरमहा स्वयं-प्रकटन जाहीर करणे, केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाने निर्धारित केलेल्या संस्थांकडे नोंदणी, उद्योग आधार नोंदणी, फोटो, व्हिडिओ, मजकुराची निवड, पडताळणी कशी करायची, याबाबतच्या फॅक्ट चेक वेबसाईट्स, जाहिरात महसूल मिळवण्याचे निकष, कंटेंटचे मार्केटिंग आदींचा समावेश हाेता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.