आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झेडपी सभापती निवडणुकीचा निकाल जाहीर:चारही पदांवर वंचित विजयी; कार्यकर्त्यांनी फटाके फोडून केला जल्लोष

अकोला21 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेच्या चार सभापती पदाच्या निवडणुकीचा निकाला शनिवारी जाहीर करण्यात आला. भाजपने मतदान केल्याने सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीने चारही पदांवर विजय मिळवला. या निवडणुकीत महािवकास आघाडीचा पराजय झाला. निकाल जाहीर झाल्यानंतर वंचितच्या कार्यकर्त्यांनी फटाके फाेडून जल्लाेष केला.

पुढील अडीच वर्षांसाठी शनिवारी सभापतींच्या चार पदाच्या निवडीसाठी विशेष सभा 29 ऑक्टाेबर राेजी पार पडली हाेती. मात्र एका प्रकरणात न्यायालयाने निकाल जाहीर करण्यास स्थगिती दिली हाेती. मंगळवारी स्थगिती उठल्याने शनिवारी निकाल जाहीर झाला. निवडणूक प्रक्रियेत अध्यासी अधिकारी म्हणून उपविभागीय अधिाकरी डाॅ. नीलेष अपार हाेते.

अशी मिळाली मते

 • विषय समितीच्या दाेन सभापती पदांसाठी सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीच्या माया नाईक व योगिता रोकडे आणि महािवकास आघाडीकडून काँग्रेसचे गजानन काकड व अपक्ष सदस्य सम्राट डोंगरदिवे आणि यांच्यात लढत झाली. वंचितच्या उमेदवारांना प्रत्येकी 27 तर महािवकास आघाडीला प्रत्येकी 26 मते मिळाली.
 • समाजकल्याण सभापती पदासाठी महाविकास आघाडीतील शिवसेनेचे डाॅ.प्रशांत अढाऊ व वंचित बहुजन आघाडीच्या आम्रपाली अविनाश खंडारे यांच्याात लढत झाली. वंचितला 27 तर महािवकास आघाडीला 25 मते मिळाली. शिवसेनेची एक सदस्या उशिरा आल्याने त्या या पदासाठीच्या निवडणुकीत सहभागी हाेऊ शकल्या नाहीत.
 • महिला व बालकल्याण सभापती पदासाठी वंचित बहुजन आघाडीच्या रिजवाना परवीन शेख मुक्तार व महािवकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुमन गावंडे आणि निवडणूक रिंगणात होत्या वंचिला 27 मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेसला 26 मतांवर समाधान मानावे लागले.

असे आहे संख्याबळ

 • वंचित बहुजन आघाडी:- 25
 • शिवसेना:- 12
 • भाजप:- 05
 • काँग्रेस:- 04
 • राष्ट्रवादी काँग्रेस:- 04
 • प्रहार जनशक्ति पक्ष:- 01
 • अपक्ष:- 02

त्यामुळे प्रकरण गेले न्यायालयात

शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा परिषद सदस्या लता पवार यांची निवड विभागीय आयुक्तांनी 28 ऑक्टाेबरला रद्द ठरविली हाेती. विहित मुदतीत अनुसूचित जमाती जात वैधता प्रमाणपत्र, दस्तावेज सादर न केल्याने ही कार्यवाही करण्यात आली हाेती. त्यामुळे पवार यांनी निवडणुकीच्या दिवशी सकाळीच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली हाेती अखेर दुपारी न्यायालयाने त्यांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी करून घेण्यचा आदेश दिला आणि पुढील सुनावणीपर्यंत निकाल जाहीर न करण्यास सांगितले हाेते. मात्र नंतर हे प्रकरण निकाली काढत न्यायालयाने निकाल जाहीर करण्यास परवानगी दिली.

बातम्या आणखी आहेत...