आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला राज:चारही पदांवर वंचित विजयी; मिनी मंत्रालयावर महिला राज

अकाेलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेच्या चार सभापतिपदाच्या निवडणुकीचा निकाल शनिवारी ५ नाेव्हेंबरला जाहीर करण्यात आला. भाजपच्या दाेन सदस्यांनी मतदान केल्याने सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीने चारही पदांवर विजय मिळवला. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराजय झाला. ‘वंचित’ने केलेल्या विजयाच्या जल्लाेषात भाजप गटनेत्या स्वत: सहभागी झाल्या. ‘वंचित’कडून त्यांचे स्वागत करण्यात आले.

सन २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत ‘वंचित’ने स्वळावर लढत सर्वाधिक जागांवर विजय प्राप्त केला हाेता. मात्र गतवर्षी ओबीसी आरक्षण संपुष्टात आल्यानंतर १४ जागांसाठी पुन्हा निवडणूक झाली हाेती. त्यानंतर ऑक्टाेबर २०२१ मध्ये दाेन सभापती पदांसाठी निवडणूक झाली हाेती. यात महाविकास आघाडीतर्फे प्रहार व एक अपक्षाला निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले हाेते. भाजपने प्रहार व अपक्षाला साथ दिल्याने ‘वंचित’चा पराभव झाला हाेता. दरम्यान शनिवारी उर्वरित अडीच वर्षांसाठी झालेल्या सभापती पदाच्या निवडणुकीत ‘वंचित’चा िवजय झाला. त्यामुळे ‘वंचित’च्या कार्यकर्त्यांनी फटाके फाेडून जल्लाेष केला. या वेळी जि.प.अध्यक्षा संगीता अढाऊ, उपाध्यक्ष सुनील फाटकर, जिल्हाध्यक्ष प्रमाेद देंडवे, महासचिव मिलींद इंगळे, गटनेते ज्ञानेश्वर सुलताने, सर्व सभापती, सदस्य रामकुमार

अशी मिळाली मते
विषय समितीच्या दाेन सभापती पदांसाठी वंचितच्या माया नाईक व योगिता रोकडे आणि महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे गजानन काकड व अपक्ष सदस्य सम्राट डोंगरदिवे आणि यांच्यात लढत झाली. ‘वंचित’च्या उमेदवारांना प्रत्येकी २७ तर महाविकास आघाडीला प्रत्येकी २६ मते मिळाली. समाजकल्याण सभापती पदासाठी महाविकास आघाडीतील शिवसेनेचे डाॅ. प्रशांत अढाऊ व ‘वंचित’च्या आम्रपाली खंडारे यांच्याात लढत झाली. ‘वंचित’ला २७ तर महाविकास आघाडीला २५ मते मिळाली.

महिला व बालकल्याण सभापती पदासाठी ‘वंचित’च्या रिजवाना परवीन शेख मुक्तार व महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुमन गावंडे या निवडणूक रिंगणात हाेत्या. ‘वंचित’ला २७ मिळाली तर राकाँला २६ मतांवर समाधान मानावे लागले.

‘वंचित’मध्येही रंगले नाराजी नाट्य
या संदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा परिषद समाज कल्याण सभापतीपदावरून ‘वंचित बहुजन आघाडी’मध्ये नाराजीनाट्य रंगले हाेते. एका नेत्यांने थेट साहेबांपर्यंत आपल्या समर्थकासाठी आग्रह धरल्याचे समजते. तसेच उपाध्यक्षपदावरूनही अनेकांची फिल्डींग लावण्याचा प्रयत्न केला. मात्र ‘वंचित बहुजन आघाडी’मध्ये फिल्डींग लावण्यातही यश येत नाही, यावर निकालानंतर पुन्हा एकदा शिक्कामाेर्तब झाले.

...त्यामुळे निकालावर हाेती स्थगिती
शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्या लता पवार यांची निवड अमरावती विभागीय आयुक्तांनी रद्द ठरवली हाेती. त्यामुळे लता पवार यांनी निवडणुकीच्या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली हाेती. उच्च न्यायालयाने त्यांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचा आदेश दिला आणि पुढील सुनावणीपर्यंत निकाल जाहीर न करण्यास सांगितले हाेते. मात्र नंतर हे प्रकरण निकाली काढत न्यायालयाने निकाल जाहीर करण्यास परवानगी दिली.

बातम्या आणखी आहेत...