आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशिक्षण:आपत्ती व्यवस्थापनाचे ‘काटेपुर्णा’त प्रशिक्षण

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी करायच्या उपाययोजनांसदर्भात महान येथील काटेपूर्णा प्रकल्पात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळा मंगळवारी झाली. आपत्ती व्यवस्थापन शोध व बचावाच्या अनुषंगाने तयारी करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव पथकाचे प्रशिक्षण काटेपूर्णा प्रकल्पात झाले. यावेळी पूरस्थितीत बचावाच्या उपाययोजना, बोटचा उपयोग, प्रथमोपचारांवर प्रशिक्षण दिले. उपस्थित सर्व शोध व बचाव पथक सदस्य यांचे प्रात्यक्षिक घेतले.

प्रशिक्षणासाठी एसडीआरफ नागपूरचे पथक उपस्थित होते. प्रशिक्षणाला जिल्हाधिकारी नीमा अरोरा, नविासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, स्वयंसेवा संस्थेचे प्रतिनिधी, तलाठी सुनील कल्ले, निमकंडे, संदीप वाघडकर, वंदेमातरम् आपत्कालीन पथक कुरणखेड, आपत्कालीन पथक वनोजा, शिक्षक, आरएलटीतील एनएसएसचे विद्यार्थी व समन्वय प्रा. मडावी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...