आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:श्री शिवाजी महाविद्यालयामध्ये आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा; विद्यार्थी, विद्यार्थिनींना मान्यवरांनी केले मार्गदर्शन

अकोट4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आपत्तीव्यवस्थापन कार्यशाळा झाली. रसायनशास्त्र विभाग, प्रिन्सिपल ब्रिगेड, आपत्ती व्यवस्थापन मंडळाच्या संयुक्त सहकार्याने या कार्यशाळेचे आयोजन केले होते.

प्राचार्य डॉ. सुनील पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा झाली. कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून अकोला येथील आर. एल. टी. विज्ञान महाविद्यालयाचे प्रा. डॉ. सुधीर कोहचाळे, प्रा. शैलेंद्र मडावी, प्रा.शंकेश झायटे विशेष प्रशिक्षक होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुनील पांडे, उपप्राचार्य डॉ. एस. पी. वाघ, डॉ. रवी जुमळे उपस्थित होते.

कार्यशाळेचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते केले. नैसर्गिक, मानवनिर्मित आपत्ती, त्यावर बचावात्मक व्यवस्थापन कसे करायचे याकरता कार्यशाळेचे आयोजन केले होते. डॉ. सुधीर कोहचाळे यांनी इमर्जन्सी मेडिकल सर्विसेस, मेडिकल फर्स्ट रिस्पॉन्डर यावर मार्गदर्शन केले. बांधपट्ट्या, गाठीचे प्रकार, त्याचे महत्त्व याचे प्रशिक्षण दिले.

प्रा. शैलेंद्र मडावी यांनी प्रथमोपचार म्हणजे काय,त्यासाठी लागणारे साधने व त्यांचे उपयोग यावर मार्गदर्शन केले. सीपीआर व बेशुद्ध व्यक्तीला कृत्रिम श्वसन कसे द्यायचे याबाबत प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले. प्रा. शंकेश झायटे यांनी प्रयोगशाळेतील अपघात, अग्निशमन यंत्राचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक दाखवले. नैसर्गिक आपत्तींना तोंड कसे द्यायचे उपलब्ध साधनांचा वापर करून संकट समयी स्वतःला व समाजाला सुरक्षित कसे ठेवायचे याबाबत मार्गदर्शन, प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मिळाले. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. नागेश नहाटे, प्रा. डॉ. चंद्रशेखर लाडोळे व प्रा. उमर भाटी यांनी केले. सूत्रसंचालन राधिका गंधारे व श्रद्धा शेगोकार यांनी केले तर प्रास्ताविक प्रा. नागेश नहाटे यांनी केले. आभार डॉ. चंद्रशेखर लाडोळे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...