आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विसर्ग:काटेपूर्णासह तिन्ही मध्यम प्रकल्पांतून विसर्ग सुरूच

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील सर्वात मोठ्या काटेपूर्णा प्रकल्पासह तिन्ही मध्यम प्रकल्पातून विसर्ग सुरूच आहे. दरम्यान लघु प्रकल्प अद्यापही ओसंडून वाहत आहे. परिणामी प्रशासनाने नदी-नाल्याकाठची गावे तसेच वस्त्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

जिल्ह्यातील काटेपूर्णा आणि वान या दोन्ही मोठ्या प्रकल्पाचे दरवाजे आतापर्यंत वारंवार उघडावे लागले आहेत. काटेपूर्णा प्रकल्पाचे दरवाजे ३१ जुलै रोजी या वर्षी पहिल्यांदा उघडावे लागले होते. तर वान प्रकल्पाचे त्यापूर्वीच उघडण्यात आले होते. दोन्ही प्रकल्पाचे सर्वच्या सर्व दरवाजे आतापर्यंत उघडल्या गेले. नियमानुसार काटेपूर्णा प्रकल्पात ३१ ऑगस्टपर्यंत साठवण क्षमतेच्या ९५ टक्के जलसाठा ठेवता येतो. ९५ टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा उपलब्ध झाल्यास प्रकल्पातील आवक पाहून दरवाजे उघडले जातात. काटेपूर्णा प्रकल्पात २० ऑगस्टला रात्री ९ वाजता ९५ टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा उपलब्ध झाल्याने प्रकल्पाचे दोन दरवाजे ३० सेंमी.ने उघडण्यात आले. यातून ५०.१६ घमी. प्रतिसेकंद (५०१६० प्रतिसेकंद) पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

त्यामुळे प्रशासनाने काटेपूर्णा नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तूर्तास प्रकल्पात ९५.७० टक्के जलसाठा आहे. प्रकल्पाचा जलसाठा जोपर्यंत ९५ टक्क्यांवर येत नाही, तोपर्यंत प्रकल्पाचे दरवाजे उघडे ठेवले जाणार आहे. तसेच पाण्याची आवक वाढल्यास प्रकल्पाचे दोन पेक्षा अधिक दरवाजे उघडले जातील, अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली.

एकीकडे काटेपूर्णा प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले असताना पातूर तालुक्यातील मोर्णा प्रकल्प, निर्गुणा प्रकल्प, मूर्तिजापूर तालुक्यातील उमा प्रकल्प तसेच जिल्ह्यातील २० लघु प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे.

मध्यम प्रकल्पांपैकी सर्वाधिक विसर्ग उमा प्रकल्पातून
जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांना दरवाजे नाहीत. त्यामुळे प्रकल्प १०० टक्के भरल्या नंतर सांडव्यावरून विसर्ग सुरू होतो. सर्वाधिक विसर्ग उमा प्रकल्पाच्या सांडव्यावरून १० सेंमी.ने विसर्ग सुरू असून २१.५७ घनमीटर प्रतिसेकंद विसर्ग नदीपात्रात सोडले जात आहे.

प्रकल्पातील विसर्ग असा
प्रकल्प घनमीटर प्रतिसेकंद
काटेपूर्णा ५०,१६०
मोर्णा १८,३४०
निर्गुणा प्रकल्प २,३४०
उमा प्रकल्प २१,५७०

बातम्या आणखी आहेत...