आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Discharge From Five Major Projects In West Vidarbha; ​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​ A Warning Was Given To The Villages Along The River By The Administration| Marathi News

दिलासा:पश्चिम विदर्भातील पाच मोठ्या प्रकल्पातून विसर्ग सुरू; ​​​​​​​ प्रशासनाने दिला नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

अकोला18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पश्चिम विदर्भातील अनेक भागात पाऊस झाल्याने ९ मोठ्या प्रकल्पांपैकी ५ प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. याच बरोबर २७ मध्यम प्रकल्पांपैकी १६ प्रकल्प ओसंडून वाहत आहेत. यावर्षी जुलै अखेरपासून प्रकल्पाचे दरवाजे उघडावे लागले आहेत. जुलै, ऑगस्ट तसेच आता सप्टेंबर महिन्यातही प्रकल्पाचे दरवाजे उघडावे लागले आहेत. या दरवाजातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे.

मोठ्या प्रकल्पांपैकी सर्वाधिक विसर्ग हा अमरावती जिल्ह्यातील ऊर्ध्व वर्धा प्रकल्पातून सुरू आहे. प्रकल्पाच्या १३ गेट ४५ सेंमी.ने उघडले असून, यातून ९४२.०० घनमीटर प्रतिसेकंद विसर्ग सुरू आहे. तर यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा प्रकल्पाचे चार दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. याच बरोबर १६ मध्यम प्रकल्पातूनही विसर्ग सुरू आहे.

या मध्यम प्रकल्पातून विसर्ग
पश्चिम विदर्भातील मध्यम प्रकल्पांपैकी अमरावती जिल्ह्यातील पूर्णा, पंढरी, गर्गा. यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस, सायखेडा, गोकी, वाघाडी, बोरगाव, नवरगाव. अकोला जिल्ह्यातील मोर्णा, उमा. वाशीम जिल्ह्यातील अडाण, एकबुर्जी. बुलडाणा जिल्ह्यातील मस, कोराडी, उतावळी, या मध्यम प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सर्वाधिक विसर्ग हा सायखेडा प्रकल्पातून सुरू असून, ५६.६६ घनमीटर प्रतिसेंकद विसर्ग सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...