आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विसर्ग:वान प्रकल्पामधून विसर्ग सुरू; काटेपूर्णामध्ये 60 टक्के साठा

अकोला6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील दुसऱ्या मोठ्या वान प्रकल्पातून अद्यापही विसर्ग सुरु आहे. प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडण्यात आलेले आहे. तर सर्वात मोठ्या काटेपूर्णा प्रकल्पात ५९.२८ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे.

दरम्यान या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार वान प्रकल्पातून १८ जुलै पासून विसर्ग सुरुच आहे. केवळ विसर्ग कमी करण्यात आला आहे. तर मध्यम आणि लघु प्रकल्पातील जलसाठ्यातही वाढ झाली आहे. जिल्ह्यात दोन मोठे, तीन मध्यम आणि २४ लघु प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमुळे जिल्ह्याच्या आर्थिक घडामोडीत मोठा वाटा असतो. प्रकल्पात १०० टक्के जलसाठा उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांना रबी हंगाम घेता येतो. त्यामुळे जिल्ह्यातील जल प्रकल्पातील जलसाठ्याकडे नागरिकांचे लक्ष लागले असते. जिल्ह्यातील दोन मोठ्या प्रकल्पांपैकी वान प्रकल्पाचे दरवाजे साेमवारी १८ जुलै रोजी उघडण्यात आले होते.

प्रथम चार नंतर सहा दरवाजे उघडण्यात आले. पावसाची रिपरिप कमी झाल्या नंतर चार दरवाजे बंद करण्यात आले. मात्र अद्यापही दोन दरवाजे उघडलेले असून यातून १२.३० घनमिटर प्रतिसेकंद (१२ हजार ३०० लिटर प्रतिसेकंद) पाण्याचा विसर्ग सुरु आहे. परिणामी प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान काटेपूर्णा प्रकल्प जलसाठ्यात माघारलेला होता. मात्र वाशिम, मेडशी, मालेगाव या परिसरात पाऊस झाल्याने काटेपूर्णा प्रकल्पाच्या जलसाठ्यात आता वाढ होत आहे. गुरुवारी २१ जुलै रोजी काटेपूर्णा प्रकल्पात ४५.९२ दशलक्ष घनमिटर जलसाठा होता. तर २४ जुलै रोजी ५१.१९ दलघमी जलसाठा उपलब्ध झाला. जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाल्याने मोर्णा, निर्गुणा, उमा या मध्यम आणि २४ लघु प्रकल्पाच्या जलसाठ्यातही सतत वाढ होत आहे.

बातम्या आणखी आहेत...