आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा:काटेपुर्णा तील विसर्ग बंद;वान प्रकल्पामधून मात्र सुरू

अकोला6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील सर्वात मोठ्या काटेपूर्णा प्रकल्पातील विसर्ग बंद करण्यात आला तर दुसऱ्या मोठ्या वान प्रकल्पातून विसर्ग मात्र सुरु आहे. दरम्यान जिल्ह्यातील मध्यम, लघु प्रकल्पही ओसंडून वाहात असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

दरम्यान या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील सर्वात मोठ्या काटेपूर्णा प्रकल्पाचे ३१ जुलै रोजी दरवाजे उघडण्यात आले होते. बुधवारी ३ ऑगस्टला हे दरवाजे बंद केले. मात्र गुरुवारी ४ ऑगस्टला प्रकल्पाचे दहाही दरवाजे उघडले. हे उघडलेले दरवाजे शनिवारी ६ ऑगस्टला रात्री आठ वाजता बंद केले. दरम्यान वान प्रकल्पाचे शुक्रवारी ५ ऑगस्टला दोन दरवाजे सायंकाळी पाच वाजता उघडले.

प्रकल्पात येणारा फ्लो वाढत राहिल्याने शनिवारी ६ ऑगस्टला चार दरवाजे उघडून विसर्ग वाढवला. हा विसर्ग वृत्त लिहीपर्यंत सुरुच होता. एकीकडे मोठ्या प्रकल्पातून विसर्ग सुरु असताना जिल्ह्यातील मोर्णा, निर्गुणा या प्रकल्पातूनही मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु असल्याने प्रशासनाने मोर्णा, विद्रुपा, वान, पूर्णा आदी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दगड पारवातील विसर्ग बंद केला आहे.मोर्णा,विद्रुपा नदी दुथडी भरुन : दगड पारवा प्रकल्पाचे तीन दरवाजे बंद केले आहेत.तर मोर्णा प्रकल्प ओसंडून वाहात आहे. त्यामुळे विद्रुपा आणि मोर्णा नदी दुथडी भरुन वाहात आहे.

बातम्या आणखी आहेत...