आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दगडपारवा प्रकल्पाचे 2 दरवाजे उघडले:ताशी 2 कोटी 95 लाख लिटरने नदीपात्रात विसर्ग; नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा

अकोला18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दगड पारवा प्रकल्पाचे दोन दरवाजे 5 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहे. यातून 8.20 घनमिटर प्रतिसेकंद (8 हजार 200 लिटर प्रतिसेकंद) विसर्ग सुरू आहे.परिणामी तासाला 2 कोटी 95 लाख 20 हजार लिटर पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. तसेच प्रशासनाने नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

दगडपारवा येथे धरण बांधण्याचा निर्णय

शहरातून वाहणाऱ्या मोर्णा नदीला सतत पूर येत होता. त्यामुळे शहराचे पुरापासून संरक्षण करण्यासाठी 1995 साली पुरसंरक्षक भिंत बांधण्याचा निर्णय घेतला. कामही सुरू झाले. मात्र भिंत बांधताना अडचणी आल्याने हे काम बंद करण्यात आले. या ऐवजी मोर्णा नदीवर मेडशी जवळ ऊर्ध्व मोर्णा तसेच पातूर तालुक्यात निम्न मोर्णा तसेच मोर्णा नदीला येवून मिळणाऱ्या विद्रुपा नदीवर बार्शिटाकळी तालुक्यात दगडपारवा येथे धरण बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.

तर मोर्णा नदीवर यापूर्वी मोर्णा प्रकल्प बांधण्यात आले होते. दरम्यान उर्ध्व मोर्णा, दगड पारवा प्रकल्पाचे काम पूर्ण झाले. मात्र निम्न मोर्णा प्रकल्पाच्या कामास शेतकऱ्यांनी विरोध केल्याने या प्रकल्पाचे काम सुरू होऊ शकले नाही. मोर्णा नदीवर दोन धरणे आणि तिला मिळणाऱ्या विद्रुपा नदीवर धरण बांधल्याने शहरात पूर येण्याचे प्रमाण कमी झाले.

प्रकल्पात 10.19 दलघमी जलसाठा उपलब्ध

दगडपारवा प्रकल्पाची साठवण क्षमता 21.19 दशलक्ष घनमिटर असली तरी 10 दशलक्ष घनमिटर पाणी पूराचे पाणी म्हणून टप्प्या-टप्प्याने सोडले जाते. त्यामुळे उपयुक्त साठा 10.19 दशलक्ष घनमिटर गृहित धरला गेला आहे. तुर्तास प्रकल्पात 10.19 दलघमी जलसाठा उपलब्ध झाल्याने तसेच मंजुर जलाशय परिचालना नुसार 15 सप्टेंबर पर्यंत 96.66 टक्के जलसाठा ठेवता येतो त्यामुळे सायंकाळी पाच वाजता प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडण्यात आले. परिणामी प्रशासनाने विद्रुपा तसेच मोर्णा नदीकाठच्या गावांना तसेच वस्त्यांना दक्षतेचा इशारा दिला आहे.

मोर्णा नदीत ताशी 6 कोटी 54 लाख लिटरचा विसर्ग

मोर्णा नदीवरील मोर्णा प्रकल्पाच्या सांडव्यावरुन 9 सेंटीमीटरने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. 9.98 घनमिटर प्रतिसेंकदाने हा विसर्ग सुरु आहे. ताशी 3 कोटी 59 लाख 28 हजार लिटर पाणी मोर्णा नदीपात्रात सोडले जात आहे. तसेच दगड पारवा प्रकल्पातून सोडलेले पाणी मोर्णा नदीला येवून मिळते. त्यामुळे मोर्णा नदीपात्रात ताशी 6 कोटी 54 लाख 48 हजार लिटर पाणी सोडले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...