आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहराचे पूरापासून संरक्षण करण्यासाठी बांधण्यात आलेल्या दगड पारवा प्रकल्पाचे चार पैकी तीन दरवाजे उघडण्यात आले आहे. यातून ताशी 6 कोटी 58 लाख 80 हजार लिटर पाण्याचा विसर्ग सुरु आहे. परिणामी प्रशासनाने विद्रुपा तसेच मोर्णा नदीकाठच्या वस्त्या तसेच गावांना दक्षतेचा इशारा दिला आहे.
प्रकल्पात 8 दलघमी जलसाठा उपलब्ध
शहरातून वाहणाऱ्या मोर्णा नदीला सतत येणाऱ्या पुरापासून शहराचे संरक्षण करण्यासाठी मोर्णा नदीवर दोन तर मोर्णा नदीला येवून मिळणाऱ्या विद्रुपा नदीवर धरण बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्रुपा नदीवर दगड पारवा येथे 21.19 दशलक्ष घनमीटर साठवण क्षमतेचा प्रकल्प बांधण्यात आला. यातील 10 दलघमी पाणी पुराचे पाणी म्हणून टप्प्या-टप्प्याने सोडण्याचे धोरण निश्चित करण्यात आले. मात्र प्रकल्पात 8 दलघमी जलसाठा उपलब्ध झाल्या नंतर प्रकल्पाचे दरवाजे उघडले जातात. यामुळे शहरातून वाहणाऱ्या नदीला पुर येण्याची शक्यता निर्माण होते.
जुलै महिन्यात 1 दरवाजा उघण्यात आला
जुलै महिन्यातही प्रकल्पाचा एक दरवाजा उघडण्यात आला होता. तर आता 2 ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता एक दरवाजा उघडण्यात आला होता. दगड पारवा प्रकल्प पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने 4 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता प्रकल्पाचा दुसरा तर रात्री दहा वाजता तिसरा दरवाजा उघडण्यात आला. यातून 18.30 घनमिटर प्रतिसेंकद (18 हजार 300 लिटर प्रतिसेकंद) पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. त्यामुळे चार पैकी तीन दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. परिणामी तासाला 6 कोटी 58 लाख 80 हजार लिटर पाण्याचा विसर्ग विद्रुपा नदीपात्रात सुरु आहे.
वस्त्यांना दक्षतेचा इशारा
विद्रुपा नदी आता शहरातून वाहते. त्यामुळे विद्रुपा नदीलगत असलेल्या खडकी भाग तसेच मोर्णा नदीकाठच्या वस्त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
प्रकल्पातील जलसाठा असा
- काटेपूर्णा - 86.35 --- 71.73 दलघमी - 83.13 टक्के
- वान -- 81.95 --- 59.71 दलघमी- 72.81 टक्के
- मोर्णा - 41.46 -- 40.38 दलघमी- 97.40 टक्के
- निर्गुणा - 28.85 - -- 28.41 दलघमी - 98.47 टक्के
- उमा - 11.68 -- 10.11 दलघमी - 86.56 टक्के
- दगड पारवा -- 10.81 दलघमी - 106.81 टक्के
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.