आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Discussions With Joint Directors For Demands Including Vacancies, Work Responsibilities; Maharashtra Zilla Parishad Nurses Association |marathi News

जिल्हा परिषद:रिक्त पदे, कामांच्या जबाबदारीसह मागण्यांसाठी सहसंचालकांशी चर्चा; महाराष्ट्र जिल्हा परिषद नर्सेस संघटना

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिक्त पदे, कामांच्या जबाबदारीसह अन्य प्रलंबित मागण्यासाठी महाराष्ट्र जिल्हा परिषद नर्सेस संघटनेने आरोग्य विभागाच्या सहसंचालकांची भेट घेतली. संघटना व सहसंचालकांमध्ये झालेल्या बैठकीत मागण्यांबाबत चर्चा झाली. आरोग विभाग मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

नर्सेस संघटनेने मागण्यांबाबत नर्सेस संघटनेने अकोल्यात २७ ऑक्टोबर रोजी कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले होते. प्रशासनाने मागण्यांबाबत आश्वासन दिले. मात्र आश्वासन पूर्ण न केल्याचा आरोप संघटनेने केला होता. याबाबत आरोग्य अधिकाऱ्यांचीही भेट घेतली होती. अखेर महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटनेने पुण्यात धाव घेत सहसंचालक स्वप्नील लाळे, मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेगावकर यांच्यासोबत चर्चा केली.

या वेळी सचवि नीलिमा तातेकर वैशाली दुर्गाडे प्रज्ञा तायडे , अकोला जिल्हाध्यक्षा संगीता जाधव यांच्यासह अन्य जिल्ह्यांच्या जिल्हाध्यक्षां उपस्थित होत्या.

या आहेत संघटनेच्या मागण्या

१) आरोग्य सेविका आरोग्य सेवकांचे २०२२ नुसार नवीन सुधारित जॉब चार्ट तयार करून देण्यात यावेत.
२) उपकेंद्राअंतर्गत वेगवेगळ्या प्रकारच्या डाटा एन्ट्री कराव्या लागत आहे. नोडल ऑफिसरनुसार व नोडल
कर्मचाऱ्यानुसार व्यवस्थित विभागणी करण्यात याव्यात.
३) उपकेंद्र स्तरावरील इलेक्ट्रिक बिल भरण्याची जबाबदारी एकट्या आरोग्य सेविकेची नसून, हे संपूर्ण नियुक्त कर्मचाऱ्यांची असे.
४) उपकेंद्र स्तरावरील नविासस्थानातील मीटर हे वेगळे करण्यात यावेत.
५) प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर ओ.पी.डी आरोग्य सेविकेसाठी व उपकेंद्रस्तरावर एका कंत्राटी आरोग्य सेविकेची िनयुक्ती करण्यात यावी.
६) प्रशिक्षण केंद्र ,जिल्हा परिषद व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात प्रत्येकी एक आरोग्य सेविका व आरोग्य साहाय्यिकांची पदे असावीत.

बातम्या आणखी आहेत...