आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनावणी:कार्यकारीणी बरखास्ती; सुनावणी 7 जुलैला

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

​​​​तालुक्यातील अंदुरा येथील विद्या मंदिर शाळा कार्यकारिणी बरखास्त करून नवीन कार्यकारिणीसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्याच्या ठरावाला विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी स्थगिती दिल्यानंतर आता याप्रकरणाची सुनावणी ७ जुलैला होणार आहे. याबाबत ठराव जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत घेण्यात आला होता. जिल्हा परिषदेची सभा २३ मार्च २०२२ रोजी पार पडली होती.

सभेच्या विषय सूचीवर १३ क्रमांकाचा ठराव हा विद्यामंदिर प्राथमिक शाळेची विद्यमान कार्यकारिणी बरखास्त करून अध्यक्ष व सदस्यांच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे, हा होता. विषय सत्ताधारी वंचितने मंजूर करून घेतला. मात्र सदर संस्थेच्या विद्यमान कार्यकारिणीचे अध्यक्ष फुलचंद पाटील यांनी विभागीय आयुक्तांकडे धाव घेत घेतली. त्यानुसार विभागीय आयुक्तांकडे झालेल्या सुनावणीत सदर ठरावाची अंमलबजावणी अंतिम आदेश येईपर्यंत न करण्याचा स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या.

विद्या मंदिर शाळा कार्यकारिणी बरखास्तीचा ठराव विशेष सभेत मांडताच त्याला शिवसेना सदस्यांनी विरोध केला होता. विद्यमान कार्यकारिणी मुदत संपण्यापूर्वी बरखास्त करणे अयोग्य असल्याचे मत मांडले होते. मात्र शाळेची दुर्दशा व भौतिक सुखसुविधा पाहता विकास खुंटला असल्याचा दावा करीत सत्ताधारी वंचितच्या सदस्यांनी ठराव मंजूर करण्याचा आग्रह धरला होता. तसेच निवडणूक घेण्याचीही मागणी केली. अखेर जि.प. अध्यक्षांनी सदर ठराव मंजूर करत विरोधकांची कोंडी केली होती.

बातम्या आणखी आहेत...