आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाडीबीटी प्रणाली:महाविद्यालयस्तरावर प्रलंबित अर्ज निकाली काढा ; नोंदणीकृत अर्ज प्रमाणापेक्षा अत्यल्प

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत द्यावयाच्या शिष्यवृत्ती व अन्य योजनांचा लाभ महाडीबीटी प्रणालीद्वारे दिला जातो. त्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील नवीन अर्ज व अर्जांचे नुतनीकरण महाविद्यालयस्तरावर प्रलंबित असलेल्या महाविद्यालयांनी आपल्यास्तरावर प्रलंबित अर्ज निकाली काढण्याची कार्यवाही करावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत महाडिबीटी प्रणालीवर अनुसूचित जाती, वि.जा., भ.ज., इमाव. व विशेष मागास प्रवर्गाकरीता भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिक्षण फी, परीक्षा फी प्रदाने, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न वसतीगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन, व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना राबविण्यात येतात.

बातम्या आणखी आहेत...