आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Dispute Between Small Businesses With Encroachment Squad, Encroachment On Gandhi Chowk To Fateh Chowk Subhash Chowk Road In The City

अतिक्रमण पथकासोबत लघु व्यावसायिकांचा वाद:शहरातील गांधी चौक ते फतेह चौक-सुभाष चौक मार्गावरील अतिक्रमण काढले

अकोला8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या धडक अतिक्रमण हटाव मोहिमेच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी गांधी चौकातील चौपाटी आणि जैन मंदिर परिसरात अतिक्रमण हटवताना लघु व्यावसायीकांनी अतिक्रमण पथकातील कर्मचाऱ्यांसोबत झोंबा-झोंबी केली. त्यामुळे मोहिमे दरम्यान काही वेळ तणाव निर्माण झाला होता. मात्र सुदैवाने हा तणाव निवळला. दरम्यान महापालिकेच्या पथकाने गांधी चौक-फतेह चौक -सुभाष या मार्गातील रहदारीत अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणाचा सफाया केला.

रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या बैठकीत शहरातील मुख्य मार्गावर झालेल्या अतिक्रमणावर चर्चा झाली. यामुळे होणारे परिणाम लक्षात घेवून जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी महापालिकेला अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार सोमवार 21 नोव्हेंबर पासून अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात येत आहे. सोमवारी शहर कोतवाली चौक-टिळक रोड, अकोट फैल या मार्गावरील तर मंगळवारी खुले नाट्यगृह चौक-फतेह चौक-दीपक चौक-दामले चौक-रेल्वे मालधक्का या मार्गावर ही मोहिम राबविण्यात आली. आता पर्यंत सुरु होती. मात्र बुधवारी मोहिमे दरम्यान पथकातील कर्मचाऱ्यांसोबत अतिक्रमण धारकांनी झोंबा-झोंबी झाली. गांधी चौकातील चौपाटी परिसरात खाद्य विक्रेते दुकाना बाहेर स्टॉल लावतात तसेच तयार कपडे विकणारे चारचाकी गाडी न लावता थेट लोखंडी बारचे मोकळे शेड उभारुन व्यवसाय करतात.

अतिक्रमण हटाव पथक चौपाटीवर पोचल्यावर या लघु व्यावसायिकांनी आपले तयार कपडे काढण्याचे काम सुरु केले. त्याच बरोबर उभे केलेले शेड काढण्यास सुरुवात केली. या दरम्यान जेसीबी मशिनने हे शेड पाडण्यात आले. शेड पाडल्यानंतर पथकातील कर्मचारी लोखंडी बार उचलुन ट्रॅक्टरमध्ये टाकत असताना अतिक्रमण धारकांनी पथकाच्या कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालून हे लोखंडी बार हिसकावण्याचा प्रयत्न केला. यात ते काही प्रमाणात यशस्वी झाले. तर काही लघु व्यावसायीकांनी ट्रॅक्टरमध्ये टाकलेले लोखंडी बार लंपास केला. या दरम्यान पथकातील कर्मचारी आणि लघु व्यावसायीकांमध्ये झोंबा-झोंबी झाली.

पथकाने सुभाष मार्गावरील जैन मंदिर गल्लीतील रहदारीत अडथळा ठरलेले दुकानांचे ओटे तोडले. तसेच बाहेर आलेले टिन शेडही काढले. या ठिकाणी देखील महिलांनी पथकासोबत वाद घातला. पथकातील महिला कर्मचाऱ्यांनी या महिलांना शांत केले. अतिक्रमण पथकाने सुभाष मार्गातील दुकानांच्या बाहेर बांधलेले ओटे, टिनशेड आदींचा सफाया केला. मंहमद अली चौक ते फतेह चौक आणि महंमद अली चौक ते सुभाष चौक या मार्गावर राबविण्यात आली.

12 हातगाड्यांचा केला चुराडा

रस्त्यावर चारचाकी गाडी लावून व्यवसाय करणाऱ्यांनी पथक आल्या नंतर आपल्या चारचाकी गाड्या जैन मंदिर गल्लीत ठेवल्या. मात्र पथक गल्लीत पोचले. पथकातील कर्मचाऱ्यांनी 12 हातगाड्या हातांनी ओढून आल्या. या 12 चारचाकी गाड्यांचा जेसीबीने चुराडा करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...