आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेल्हारा:सून घरून निघून गेल्याचा वाद; भांबेरी येथे बाप-लेकाचा खून

तेल्हारा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शेजारी शेजारी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पिता-पुत्र

एक वर्षाच्या नातीला सोडून सून घरून निघून गेली. या कारणावरून नेहमीच दोन्ही कुटुंबात खटके उडत होते. याच कारणावरून शनिवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास बाप लेकाची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना तेल्हारा तालुक्यातील भांबेरी येथील घडली. पोलिसांनी मारेकऱ्यांविरुद्ध खुनाचे गुन्हे दाखल केले असून, त्यांना अटक केली आहे. पूजा अजय भोजने हिला सध्या दीड वर्षाची मुलगी आहे. सहा महिन्यापूर्वी पूजा ही प्रफुल्ल भीमराव भोजने सोबत निघून गेली. आता ते दोघे पुणे येथे राहत आहे. तेव्हापासून दोन्ही कुटुंबात वादविवाद सुरू आहेत. शनिवारी पहाटे पूजा-अजयची मुलगी आराध्याला उद्देशून तिची आजी प्रमीला देविदास भोजने म्हणाली की ‘तू आम्हाला इकडे त्रास देत आहे व तुझी आई तिकडे मजा करत आहे’.

हे बोलणे विरुद्ध पार्टी असलेल्या प्रफुल्लची आई प्रमिला भीमराव भोजने हिने दुकानावर जाताजाता ऐकले व तू आम्हाला का बोलत आहेस तू पूजाला व प्रफुल्लला बोल आम्हाला बोलू नको. असे म्हणून वाद घातला व घरी गेल्यानंतर काही वेळातच भीमराव गणपत भोजने, प्रमीला भीमराव भोजने, राजेश गणपत भोजने, दर्शन भीमराव भोजने हातात कुर्हाडी, लोखंडी पाइप घेऊन आले. त्यांनी अजय त्याचे वडील देवीदास भोजणे, भाऊ विजय देवीदास भोजणे, प्रमीला देवीदास भोजणे यांच्यावर सपासप वार केले.

त्यात देविदास भोजने यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात पडले काही अंतरावर मुलगा अजय सुद्धा रक्ताच्या थारोळ्यात पडला. तर विजय व प्रमिला देविदास भोजने हे गंभीर जखमी झाले. घटनास्थळावर देविदास भोजने यांचा मृत्यू झाला तर रुग्णालयात नेताना वाटेतच मुलगा अजयचा सुद्धा मृत्यू झाला. तेल्हारा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून आरोपींना अटक केली.

आराध्याचे डोक्यावरील वडिलांचेही छत्र हरवले
आराध्याची आई पूजा प्रफुल्ल भोजनेसोबत निघून गेल्याने तिला वडील अजय यांचा सहारा होता. मात्र आजच्या घटनेने तिच्या वडिलांचाही जीव घेतला. आता आराध्याजवळ आई नाही व वडीलही नाहीत. आई-वडिलांचे छत्रच या दीड वर्षाच्या चिमुकलीचे हरवल्याने तिला पाहून अनेकांचा जीव मात्र कासावीस होत आहे. तिच्या भविष्याचे काय होणार हा विचार अनेकांच्या मनात आहे.

बातम्या आणखी आहेत...