आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवघेणा हल्ला:जागेवरून वाद; जीवघेणा हल्ला करणाऱ्या आराेपींना कारावास

अकोला6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागेच्या वादातून जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आराेपींना कारावासाची शिक्षा सुनावली. पुरुषोत्तम दयाराम गाडगे, संतोष दयाराम गाडगे, उमेश दयाराम गाडगे, गोपाल श्रीराम गाडगे व खंडू भाऊराव गाडगे (सर्व रा. टाकळी खोजबळ, तालुका बाळापूर) अशी आराेपींची नावे आहेत.

फिर्यादी प्रवीण काशीराम साबे यांच्या परिवाराचे व आरोपींमध्ये जागेवरून वाद सुरू हाेता. फिर्यादीचे वडील काशीराम साबे यांनी आरोपींच्या विरोधात उरळ पोलिस ठाण्यात २६ मे २०१५ व २९ मे २०१५ रोजी तक्रारदेखील सादर केल्या हाेत्या. याच प्रकरणावरून ३० मे २०१५ रोजी आरोपींनी फिर्यादी प्रवीण यास त्यांचे घरासमोर लोखंडी पाइप, काठ्यांनी मारहाण केली. जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात ताे गंभीर जखमी झाला. या प्रकरणी सर्व आरोपीच्या विरोधात उरळ पोलिस स्टेशन येथे भादंविचा कलम १४७, १४८, ३०७, ५०४, ५०६, ४५० सह कलम १४९ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास ठाणेदार पी.के. काटकर यांनी केला व तपास पूर्ण झाल्यावर आरोपी विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

उपराेक्त खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश डि.बी. पतंगे यांच्या न्यायायात झाली. न्यायालयाने शनिवारी ३० जुलैला िनकाल दिला. या प्रकरणात सरकार पक्षाने एकूण आठ साक्षीदार तपासले. न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवले व विविध कलमांन्वये शिक्षा ठोठावली. जखमी प्रवीण व सचिन साबे यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांची नुकसान भरपाई आरोपींनी द्यावी असाही आदेश जारी केला. याप्रकरणात अतिरिक्त सरकारी वकील आशीष आर. फुडकर व श्याम खोटरे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. पैरवी अधिकारी म्हणून पाेलिस उपनिरीक्षक झाकिर हुसैन यांनी काम पाहिले.

अशी सुनावली शिक्षा ः १) आरोपींनी भादंवि कलम १४७, १४८, ३०७, ५०४, ५०६, ४५० सह कलम १४९ अंतर्गत दोषी ठरवून कलम १४७, १४८ सहकलम १४९ अंतर्गत एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व एक हजार रुपये दंडाची िशक्षा सुनावण्यात आली. शिक्षा तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त ३ महिने सश्रम कारावास भाेगावा
लागणार आहे.

२) कलम ३०७ सहकलम १४९ अंतर्गत ६ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त एक वर्षे सश्रम कारावास भाेगावा लागेल.

३) कलम ५०४ व ५०६ सहकलम १४९ अंतर्गत १ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त ३ महीने सश्रम कारावास.

४) कलम ४५० सहकलम १४९ अंतर्गत ४ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व ३ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त एक वर्षे सश्रम कारावास अशी शिक्षा भाेगावी लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...