आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Disruption Of Water Supply To 12 Illegal Plumbing Fixtures In South Zone Area; Corporation Squad While Disconnecting Water Supply Of Illegal Connections |marathi News

पथक‎:दक्षिण झोन भागातील 12 अवैध‎ नळजोडण्यांचा पाणीपुरवठा खंडित‎; अवैध नळजोडण्यांचा पाणी पुरवठा खंडित करताना मनपाचे पथक‎

अकोला‎10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका पाणी पुरवठा विभागाने ‎दक्षिण झोन मधील १२ अवैध ‎नळजोडणीचा पाणी पुरवठा खंडीत ‎ ‎ केला. दरम्यान नागरिकांनी थकीत ‎ ‎पाणीपट्टीचा भरणा करावा तसेच‎ अवैध नळजोडण्या वैध कराव्यात, असे आवाहन पाणी पुरवठा‎ विभागाने केले आहे.‎ मनपा आयुक्‍त यांच्‍या‎ आदेशान्‍वये अकोला‎ महानगरपालिका क्षेत्रातील थकित‎ पाणीपट्टी कर आणि अवैध नळ‎ जोडणी धारकांवर मनपा जलप्रदाय‎ विभागाव्‍दारे नळ जोडणी खंडीत‎ करण्‍याची मोहीम सुरू आहे.

१७‎ जून रोजी दक्षिण झोन अंतर्गत हैदर‎ पुरा, खदान भागातील १२ अवैध नळ‎ जोडणी खंडीत करण्याची कारवाई‎ करण्‍यात आली. ही कारवाई‎ जलप्रदाय विभागाचे कार्यकारी‎ अभियंता एच.जी.ताठे यांच्‍या‎ मार्गदर्शनात जलप्रदाय विभागातील‎ कनिष्ठ अभियंता नरेश बावने,‎ ‎ ‎ ‎अक्षय वाईनदेशकर, यांचेसह‎ गजानन बोचरे समयपाल, इजाज‎ अहमद, नीरज पांडे, भरत पांडे, नंदू‎ कोकाटे, सुहास दुर्योधन, मधुकर‎ कोरडे, अजय केळकर, व्हॉल्व्ह मन‎ तसेच झोन कंत्राटदार संदीप तळेकर‎ व संजय दानदले यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...