आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपहरण:जि. प. सभापतींच्या चालकाचे अपहरण; गुन्हा दाखल

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषद पशुसंवर्धन व कृषी सभापती यांच्या शासकीय वाहनाचा अपघात करून त्यांच्या चालकाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली. याप्रकरणी जुने शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अपरणकर्त्या आरोपींचा शोध सुरू केला आहे. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन व कृषी सभापती पंजाबराव वडाळ व चालक पंजाबराव तालोट हे एमएच ३० बिके एच ५१५ क्रमांकाच्या शासकीय वाहनाने राष्ट्रीय महामार्गाने जि. प. सभापतींच्या चालकाचे अपहरण...

अकोल्यात येत होते. यादरम्यान न्यू भाजी मार्केट बायपास येथे विरुद्ध दिशेने येणाऱ्या एमएच २८ बिके १२८२ क्रमांकाच्या वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यादरम्यान गाडीतील वाहनचालक पंजाबराव तालोट यांचे अपहरण करून त्यांना खामगावच्या दिशेने नेले. वडाळ यांनी तात्काळ जुने शहर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली.

जुने शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी तपास पथक गठित करून अपहरणकर्त्याचा शोध घेण्यासाठी पोलिस पोलीस पाठविले. याप्रकरणी पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...