आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा परिषदेच्या विरक्त झालेल्या हातरुण सर्कलसाठी नविडणूक रिंगणात कायम राहिलेल्या उमेदवारांच्या यादी बुधवारी जाहीर केली. पाच उमेदवार लढणार असून, यात वंचित बहुजन आघाडी, शविसेना, कॉंग्रेस, भाजपसह एका अपक्षाचा समावेश आहे. त्यामुळे चौरंगी लढतीकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. हातरूण सर्कलमधून शविसेनेच्या सुनीता सुरेश गोरे (शविसेना) वजियी झाल्या होत्या. मात्र नामनिदर्शेनपत्र सादर करताना गोरे यांनी सोनाळा येथील मालमत्तेचा २०१४-२०१९पर्यंतच कर भरला नाही. मोरगाव भाकरे येथील शेत जमिनीचा उल्लेख प्रतजि्ञालेखात केला नाही, असा आरोप विभागीय आयुक्तांकडे दाखल केलेल्या याचिकेत केला होता. आयुक्तांनी गोरे यांना अपात्र घोषित केले होते. त्यामुळे पोटनविडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. मतदान ५ जून २०२२ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत होणार असून, ६ जूनला मतमोजणी होणार आहे. हे उमेदवार कायम ः हातरूण सर्कलच्या पोट निवडणुकीत सात जणांचे अर्ज वैध ठरले होते. दोघांनी अर्ज मागे घेतले होते. निवडणूक रिंगणात कायम असलेल्या उमेदवारांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या लिना शेगोकार, भाजपच्या राधिका पाटेकर, शविसेनेच्या अश्विनी गवई, काँग्रेसच्या रशिका इंगळे यांच्यासह अपक्ष अनिता भटकर यांचा समावेश आहे. ...त्यामुळे दोन्ही बाजूने प्रयत्न ः जुलैत अध्यक्ष- उपाध्यक्ष व सभापतींची दुसऱ्या टर्मची नविडणूक होणार आहे. सध्या सदस्य संख्य लक्षात घेता वंचित-२४, शविसेना-१३, भाजप-५, काँग्रेस-४, राकाँ-४, प्रहार-१, दोन अपक्ष, असे पक्षीय बलाबल आहे. त्यामुळे एक-एक सदस्य जुळवणे सत्ताधारी व विरोधक अशा दोन्ही बाजूने आवश्यक राहणार आहे. पोट नविडणुकीत वंचित आणि महाविकास आघाडी या दोघांसाठीही वजियश्री खेचून आणणे गरजेचे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.