आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समुपदेशन:जि. प. कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठीची प्रक्रिया सुरू; कर्मचाऱ्यांचे समुपदेशन

अकोला4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. कर्मचाऱ्यांच्या राजर्षी शाहू महाराज सभागृहात समुपदेशन करण्यात आले. अनेक वर्षे एकाच विभागात, एकाच टेबलवर काम करणाऱ्यांची उचलबागडी होण्याची शक्यता आहे. या संदर्भात सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अकोला जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांवर सत्ताधाऱ्यांचा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याचे अनेकदा घडलेल्या घटनांमधून समोर आले आहेत. दरम्यान जिल्ह्यातील ग्रामीण भागातून आपल्या विविध कामासाठी येणाऱ्या ग्रामस्थांना अनेकदा काही अधिकारी आणि कर्मचारी संबंधित विभागात भेटत नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातून शेकडो किलोमीटरवरून कामासाठी आलेल्या ग्रामस्थांच्या पदरात निराशाच पडते. जिल्हा परिषदेच्या या बेताल कारभाराचा परिणाम योजनांवर होतो. खूप वर्षांपासून एकाच ठिकाणी-एकाच टेबलवर काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या कमी नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेत एकाच ठिकाणी ठाण मांडलेल्या काही कर्मचाऱ्यांचे अनेकांशी लागेबांधेही असतात. शुक्रवारी१३ मे रोजी बदली प्रक्रियेअंर्तगत समुपदेशन झाले. या वेळी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूरज गोहाड व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. अशी झाली प्रक्रिया १) जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येत असलेल्या पंचायत समित्यांमधील बदल्यांची प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू महाराज सभागृहामध्ये गुरुवार १२ मे पासून सुरू झाली. २) बांधकाम विभाग, लघुसिंचन विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, कृषी विभाग, सामान्य प्रशासन विभाग आणि इतर विभागात कर्मचाऱ्यांना समुपदेशनासाठी सभागृहात बोलावण्यात आले होते. ३) कर्मचाऱ्यांना सध्या नियुक्तीचे ठिकाण व बदलीसाठी उपलब्ध असलेल्या जागेची माहिती देण्यात आली. रिक्त जागी कर्मचाऱ्यांची बदली करण्यात येणार आहे. ४) बदलीप्रक्रियेतअंतर्गत प्रथम प्रशासकीय व विनंतीवर बदली होणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...