आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:जि. प. चे कर्मचारी उद्यापासून‎ बेमुदत संपात घेणार सहभाग‎

अकाेला‎10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या‎ जुनी पेन्शन योजनेसह अन्य मागण्यांसाठी‎ मंगळवार १४ मार्चपासून‎ सरकारी,निमसरकारी कर्मचाऱ्यांकडून‎ पुकारण्यात येणाऱ्या संपात िजल्हा परिषद‎ कर्मचारी सहभागी हाेणार अाहेत. राज्यातील‎ सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर,‎ महापालिका, नगर पालिका, नगर परिषदा,‎ नगर पंचायती कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी‎ यांच्या काही मागण्या दीर्घकाळ प्रलंबित‎ आहेत.

याबाबत मध्यवर्ती संघटना व इतर‎ घटक संघटनांच्या मार्फत शासनाकडे चर्चा‎ व निवेदने सादर करून प्रलंबित मागण्यांबाबत‎ सकारात्मक निर्णय घ्यावेत, यासाठी प्रयत्न‎ झाले. मात्र मागण्या मंजूर झाल्या नाहीत.‎ त्यामुळे १४ मार्चपासून कर्मचाऱ्यांनी बेमुदत‎ संपाची हाक दिली आहे. संपासंदर्भात जिल्हा‎ परिषद व पंचायत समिती अंतर्गत कार्यरत‎ कर्मचारीही सहभागी होणार आहेत.‎ याबाबतचे निवेदन जि.प. कर्मचारी‎ संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना‎ देण्यात आले.

यावेळी कर्मचारी संघटनेचे‎ सुनील जानोरकर, गिरीष मोगरे, डिगांबर‎ मालगे, संतोष ताथोड, तुषार पत्की,‎ अभिजीत बन्नोरे, पुष्पक शहाने, प्रवीण‎ साखरे, गजानन उघडे, अंकुश पटेल अादी‎ उपस्थित हाेते.‎

अधिकाऱ्यांना दिले निवेदन :‎ राज्यातील सरकारी, निमसरकारी,‎ शिक्षक-शिक्षकेतर महापालिका,‎ नगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत‎ कर्मचारी यांनी बेमुदत संपाचा इशारा दिला‎ आहे. यात संपामध्ये जिल्हा परिषद व पंचायत‎ समितीमधील कर्मचारीही सक्रियरित्या‎ सहभागी होतील, असे निवेदन जि.प.‎ कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी व मुख्य‎ कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.‎

या मागण्यांसाठी संप: सर्वांना जुनी‎ पेंशन योजना लागू करण्यात यावी. कंत्राटी‎ कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्यात यावे.‎ रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत.‎ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवाअंतर्गत‎ आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात‎ यावा.‎

बातम्या आणखी आहेत...