आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायालयातील याचिका निकाली:जि. प. सभापती निवडणुकीचा निकाल शनिवारी हाेणार जाहीर

अकाेलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेच्या चार सभापती पदाच्या निवडणुकीचा निकाल शनिवारी ५ नाेव्हेंबरला जाहीर हाेणार आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील याचिका निकाली निघाल्यानंतर आता शनिवारी ५ नाेव्हेंबर राेजी निकाल घाेषित करण्याचा आदेश बुधवारी २ नाेव्हेंबरला जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला.

सभापती निवडणुकीची प्रक्रिया २९ आॅक्टाेबर राेजी झाली हाेती. विषय समितीच्या दाेन सभापती पदांसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे गजानन काकड व अपक्ष सदस्य सम्राट डोंगरदिवे आिण वंचित बहुजन आघाडीच्या माया नाईक व योगिता रोकडे यांच्यात लढत झाली. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना प्रत्येकी २७ तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना प्रत्येकी २५ मते िमळाले हाेते. तसेच समाजकल्याण सभापती पदासाठी महाविकास आघाडीतील शिवसेनेचे डाॅ. प्रशांत अढाऊ व वंचित बहुजन आघाडीच्या आम्रपाली अवनिाश खंडारे यांच्याात सामना रंगला हाेता. महिला व बालकल्याण सभापती पदासाठी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुमन गावंडे आणि वंचित बहुजन आघाडीच्या रिजवाना परवीन शेख मुक्तार या निवडणूक िरंगणात हाेत्या. वंचित बहुजन आघाडीला २७ मते मिळाली तर राकाँला २६ मतांवर समाधान मानावे लागले हाेते.

दरम्यान उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विषय समिती सभापतीपदाचा निकाल रोखून ठेवण्यात आला होता. उच्च न्यायालयाच्या निकालानुसार स्थगित रिट पिटीशन निकाली काढण्यात आली शनिवारी ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात निकाल घाेषित हाेणार असून, यासाठी अध्यासी अधिकारी म्हणून अकाेला उपविभागीय अधिकारी कामकाज पाहणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...